नाशिक

मुस्लिम धर्म स्वीकारण्यासह लग्नासाठी बळजबरी

युवतीच्या तक्रारीवरून युवकाला चार तासांत अटक; इगतपुरी पोलिसांची कारवाई

इगतपुरी : प्रतिनिधी
येथील 19 वर्षीय युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची फसवणूक करत वारंवार अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात रविवारी (दि.15) सायंकाळी सातला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर त्याच दिवशी पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव नाशिक येथे असताना संबंधित संशयिताचे मोबाइल लोकेशन समजले. यावेळी त्या एकट्या असताना मोबाइल लोकेशनचा माग काढत स्वतः जाऊन युवकाला तत्काळ अटक केली.
मुस्तफा सलीम शेख (वय 24, रा. रामनगर, पेठरोड, नाशिक) असे संशयित तरुणाचे नाव आहे. नाशिकच्या शालिमार येथील एका कपड्याच्या दुकानात तो सेल्समन आहे. त्याच्याविरोधात इगतपुरी पोलीस ठाण्यात पोक्साेंंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. ज्या दिवशी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला त्याच दिवशी रात्री संबंधित संशयिताला अटक केल्याने पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांचे पीडितेच्या कुटुंबीयांनी व नागरिकांनी आभार मानले आहेत.
याबाबत पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित मुस्तफा शेख याने चार वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून स्वतःची ओळख सोनू अशी करून दिली होती. बौद्ध समाजाचा असल्याचे खोटे सांगितले होते. मात्र, कालांतराने त्याचे खरे नाव मुस्तफा शेख समोर आले. पीडितेला धर्मांतरासाठी दबाव टाकला जात होता. या सर्व प्रकारामुळे पीडित तरुणी दबावाखाली होती. संशयिताने तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला पंचवटी पोलीस ठाण्यात नेऊन खोटे जबाब देण्यासही भाग पाडले होते. मात्र, शुद्धीवर आल्यावर तिने नकार दिला आणि कुटुंबीयांना सर्व हकीगत सांगितली. इगतपुरीच्या पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली. संशयित मुस्तफा शेखवर पीडिता अल्पवयीन असताना घडलेल्या घटनेनुसार पोक्सोेअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कांचन भोजने, गोपनीय हवालदार नीलेश देवराज व पथक तपास करीत आहेत. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांनी तातडीने पावले उचलत संशयिताला अवघ्या चार तासांत अटक केल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर 23 मार्च 2022 मध्ये पीडिता अल्पवयीन असताना संशयिताने इगतपुरी येथील बारा बंगला परिसरात तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती.

आरोपीने पीडितेवर लग्न करण्यासाठी व धर्मांतर करण्यासाठी 12 डिसेंबर 2025 व 6 जानेवारी 2026 रोजी कपालेश्वर मंदिर परिसरात बोलावले होते. न आल्यास माझ्या मामाला सांगून तुझ्या परिवाराला खतम करून टाकेन, अशी वेळोवेळी धर्मांंतर करण्यासाठी मुस्लिम युवकाने धमकी दिली होती.

11 व 18 जानेवारी 2026 रोजी पीडितेचे आई-वडील घरी नसताना संबंधित संशयिताने पीडितेच्या घरात घुसून कॅडबरी चॉकलेटच्या माध्यमातून काहीतरी गुंगीचे औषध देऊन बळजबरीने बलात्कार केल्याची माहिती पीडितेने फिर्यादीत दिली आहे.

संबंधित संशयिताला 16 मार्च रोजी नाशिक येथील स्पेशल पोक्सो न्यायालयात हजर केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांनी दिली आहे.

Forced marriage including conversion to Islam

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

5 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

5 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

5 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

5 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

5 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

5 hours ago