नाशिक

जंगलाला आग, शेतकर्‍याचे घर खाक

वासाळी : वार्ताहर
इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात सह्याद्री पर्वत रांगा असून, महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसुबाई आहे. मात्र, दरवर्षी या डोंगरांना आग लागल्याने हजारो झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे चित्र आहे.
कळसुबाई व त्याच्या बाजूच्या परिसरात मानवी वावर जरी असला तरी मोर, बिबटे यासारखे पक्षी, प्राणी मोठ्या प्रमाणात दिसून येतात. अनेक वेळा या ठिकाणी काही अपप्रवृत्तीच्या लोकांनी उन्हाळ्यात धूम्रपान करत असताना, पेटती सिगारेट टाकून दिल्याने डोंगराला आग लागल्याची घटना यापूर्वी घडली आहे. सध्या उन्हाचा पारा जवळजवळ 50 अंश सेल्सिअसच्या आसपास होत आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात तापमान वाढत आहे.
अशा गंभीर परिस्थितीत गेल्या एक महिन्यापासून अनेक डोंगरांना व जंगलांना आग लागण्याचे सत्र चालू असताना, वासाळी परिसरातील मांडव कडा लोकवस्तीमध्ये राहणारे शेतकरी रामकृष्ण गणपत कचरे हे मजुरीसाठी इतरत्र गेले होते. भर दुपारी जंगलाला आग लागून आग त्यांच्या घराजवळ आली आणि घराला आग लागली व घरातील साहित्य जळून खाक झाले. तसेच शेजारी असलेल्या दुसर्‍या घराला सुद्धा आग लागली. मात्र, वेळेत जाऊन त्यांनी ती आग विझवली. त्यामुळे अधिकचे नुकसान जरी टळले असले तरी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. काशीनाथ भाऊ कोरडे, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पार्टी यांनी सदर ठिकाणी भेट देऊन, सदर घटनेची पाहणी केली व सदर कुटुंबाला आर्थिक नुकसानभरपाई मिळावी व आग लावणार्‍या इसमाचा शोध घेऊन त्यांना कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली. सदर प्रसंगी वासाळी ग्रामपंचायतीचे सरपंच सुनीता कोरडे, ग्रामपंचायत सदस्य बाळू कचरे, गणपत कचरे, रामदास कचरे, सीताराम आंबेकर, भोरू धोंगडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Gavkari Admin

Recent Posts

पदाचा गैरवापर; तत्कालीन प्रांताधिकारी निलंबित

मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…

3 minutes ago

सर्व संतांच्या दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या वेशीवर

वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…

6 minutes ago

ओझर विमानसेवेला भरघोस प्रतिसाद

मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांची…

12 minutes ago

मनमाड शहरात वाहतूक कोंडी; गाडी बंद, रस्ता बंद

वाहनचालकांसह नागरिक त्रस्त; खासदारसाहेब, आम्हाला या जाचातून मुक्त करा! मनमाड : प्रतिनिधी दुष्काळी अन् पाणीटंचाई…

20 minutes ago

वीज वितरणकडून स्मार्ट मीटरच्या माध्यमातून लूट

दहमहा वीजबिलात दुप्पट, तिप्पट वाढ; ग्राहकांमध्ये संतापाची भावना निफाड : तालुका प्रतिनिधी वीज वितरण कंपनीकडून…

24 minutes ago

वारी…ज्ञानराज माउलींचे वरदान!

लोकीचे वैकुंठ पंढरपूर येथे होणारा आषाढीवारीचा महामेळा महाराष्ट्राचे आध्यात्मिक व सांस्कृतिक संचित आहे. 12 व्या…

36 minutes ago