वासाळी : वार्ताहर
इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात सह्याद्री पर्वत रांगा असून, महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसुबाई आहे. मात्र, दरवर्षी या डोंगरांना आग लागल्याने हजारो झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे चित्र आहे.
कळसुबाई व त्याच्या बाजूच्या परिसरात मानवी वावर जरी असला तरी मोर, बिबटे यासारखे पक्षी, प्राणी मोठ्या प्रमाणात दिसून येतात. अनेक वेळा या ठिकाणी काही अपप्रवृत्तीच्या लोकांनी उन्हाळ्यात धूम्रपान करत असताना, पेटती सिगारेट टाकून दिल्याने डोंगराला आग लागल्याची घटना यापूर्वी घडली आहे. सध्या उन्हाचा पारा जवळजवळ 50 अंश सेल्सिअसच्या आसपास होत आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात तापमान वाढत आहे.
अशा गंभीर परिस्थितीत गेल्या एक महिन्यापासून अनेक डोंगरांना व जंगलांना आग लागण्याचे सत्र चालू असताना, वासाळी परिसरातील मांडव कडा लोकवस्तीमध्ये राहणारे शेतकरी रामकृष्ण गणपत कचरे हे मजुरीसाठी इतरत्र गेले होते. भर दुपारी जंगलाला आग लागून आग त्यांच्या घराजवळ आली आणि घराला आग लागली व घरातील साहित्य जळून खाक झाले. तसेच शेजारी असलेल्या दुसर्या घराला सुद्धा आग लागली. मात्र, वेळेत जाऊन त्यांनी ती आग विझवली. त्यामुळे अधिकचे नुकसान जरी टळले असले तरी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. काशीनाथ भाऊ कोरडे, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पार्टी यांनी सदर ठिकाणी भेट देऊन, सदर घटनेची पाहणी केली व सदर कुटुंबाला आर्थिक नुकसानभरपाई मिळावी व आग लावणार्या इसमाचा शोध घेऊन त्यांना कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली. सदर प्रसंगी वासाळी ग्रामपंचायतीचे सरपंच सुनीता कोरडे, ग्रामपंचायत सदस्य बाळू कचरे, गणपत कचरे, रामदास कचरे, सीताराम आंबेकर, भोरू धोंगडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…