माजी नगरसेवक उत्तम कांबळे यांचे निधन
नाशिक : प्रतिनिधी
महापालिकेचे माजी नगरसेवक उत्तम कांबळे यांचे काल निधन झाले. ते 82 वर्षाचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. नाशिक महापालिकेचे गेले अनेक वर्षे नगरसेवक होते. मनपा स्थायी समितीचे सभापतीपद देखील त्यांनी भूषवले होते. काँग्रेसचे एकनिष्ठ अशी त्यांची ओळख होती. नगरसेवक पदाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक विकासकामे केली. तिबेटीयन मार्केट उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. जनलक्ष्मी बँकेच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता. 1967 पासून ते नगरसेवक होते. भूतपूर्व नाशिक नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी पद भूषवले.2017 पर्यंत काँग्रेसचे सलग नगरसेवक म्हणून ते कॅनडा कॉर्नर भागातून निवडून येत, 1992 ते 1993 या कालावधीत त्यांना काँग्रेसने स्थायी समितीचे सभापती पद दिले होते, प्रकृती अस्वस्थता मुळे त्यांनी 2017 नंतर निवडणूक न लढवता त्यांचे चिरंजीव समीर कांबळे यांना राजकारणात उतरवले होते, गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली, त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, सून,नातवंडे असा परिवार आहे.