माजी आमदार कल्याणराव पाटील
यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत प्रवेश
नाशिक: प्रतिनिधी
येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत प्रवेश केला. यावेळी आमदार पंकज भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी गेल्या २० वर्षाच्या कालावधीत येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची विकासकामे केली. त्यांच्या नेतृत्वाखाली येवला लासलगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी यावेळी म्हटले आहे. त्यांच्या प्रवेशामुळे मंत्री छगन भुजबळ यांचे बळ अधिक वाढणार आहे.
माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्या प्रवेशानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत स्वागत करत शुभेच्छा दिल्या आहे.
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू झाले की, घरोघरी…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…
शेतकर्याला मारहाण करून 12 लाखांचा ऐवज लुटला ♦ किचनचा दरवाजा तोडून चौघांचा बंगल्यात प्रवेश ♦…
समोरील टायर फुटल्याने अपघात सिन्नर : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात शुक्रवारी (दि. 16) सकाळी…