माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन

नाशिक: प्रतिनिधी

दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे आज सकाळी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती, मालेगाव आणि नंतर दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार म्हणून त्यांनी अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले, पंचायत समिती, जिल्हा परिषद, येथेही त्यांनी पदे भूषवली, दिंडोरीचे खासदार असताना भाजपचे सरकार वाचवण्यासाठी एयर अंबुलन्स ने दिल्ली येथे ते गेले होते, भाजपशी एकनिष्ठ असलेले चव्हाण यांना 2019च्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने तिकीट दिले नव्हते, मात्र तरीही ते भाजपात राहून काम करत होते, त्यांच्या पश्चात पत्नी कलावती चव्हाण, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे,

ग्रामीण भागाचा विकास पुरुष हरपला

भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण साहेब यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने ७३ व्या वर्षी निधन झाल्याची बातमी मनाला चटका लावणारी आहे. पेठ – सुरगाणा या आदिवासी भागातून राजकारणाला सुरवात करणारे चव्हाण साहेब आमदार त्यानंतर खासदार म्हणून त्यांनी केलेलं कार्य ग्रामीण भागाला कलाटणी देणारे ठरले. आज ग्रामीण भागाचा विकास पुरुष हरपला आहे. जिल्हा परिषदेच्या कारकिर्दीत ते सुरगाणाचे सदस्य तसेच जिल्हा परिषदेतील विविध पदे त्यांनी भूषवली असून जिल्ह्याच्या विकासात त्यांचे मोठे योगदान राहिले त्यांची पोकळी कधीही भरून निघणारी नाही. त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची ताकद मिळो हीच ईश्वचरणी प्रार्थना…

– दादाजी भुसे, पालकमंत्री नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *