गुन्हे शाखा युनिट-2 ची कामगिरी
सिडको : विशेष प्रतिनिधी
गोकुळधाम सोसायटी, खुटवडनगर येथे कोयत्याने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याच्या प्रकरणातील चार फरार आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखा युनिट-2 ला यश आले आहे. अंबड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील या आरोपींचा शोध घेत त्यांना त्यांच्या घराच्या परिसरातून पकडण्यात आले. दि. 1 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे मित्र गोकुळधाम सोसायटीजवळ उभे असताना आरोपींनी फटाके फोडण्याच्या कारणावरून कुरापत काढली. त्यानंतर शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत, कोयत्याने डोक्यावर वार करून गंभीर दुखापत केली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेण्याबाबत वरिष्ठांच्या आदेशावरून गुन्हे शाखा युनिट-2 कडून तपास सुरू करण्यात आला.
या प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत अरसुळे, विशाल सोनवणे, समाधान आहेर आणि प्रथमेश जगताप हे त्यांच्या घराच्या परिसरात वावरत असल्याची गोपनीय माहिती हवालदार चंद्रकांत गवळी यांना मिळाली. त्यावरून प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा संजय सानप, सुनील आहेर, प्रकाश बोडके, चंद्रकांत गवळी, परमेश्वर दराडे यांच्या पथकाने गोकुळधाम सोसायटी, खुटवडनगर येथे सापळा रचून प्रशांत दत्तू अरसुळे (वय 26, रा. अनन्या सोसायटी, कोणार्कनगर, आडगाव), विशाल दीपक सोनवणे (वय 23, रा. गोकुळधाम सोसायटी, अंबड), समाधान लक्ष्मण आहेर (वय 32, रा. म्हाडा, गोकुळधाम सोसायटी, अंबड), प्रथमेश संजय जगताप (वय 24, रा. यमुनानगर, शाहूनगर, सिडको) यांना ताब्यात घेऊन चौकशीदरम्यान त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अंबड पोलीस ठाण्यात पुढील कार्यवाहीसाठी हजर करण्यात आले. ही कारवाई अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या आदेशानुसार युनिट क्र. 2 चे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सपोनि डॉ. समाधान हिरे, भारती देवकर, पोहवा संजय सानप, सुनील आहेर, प्रकाश बोडके, प्रकाश महाजन, चंद्रकांत गवळी, परमेश्वर दराडे, प्रवीण वानखेडे, महेश खांडबहाले, जितेंद्र वजीरे यांनी केली.
खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…
धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…
चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…
सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…
पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…
अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…