नाशिक

दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना अटक

28 धारदार चाकूंसह अन्य साहित्य जप्त

सिडको/नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी

नाशिकरोड पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार आरोपींना अटक करून मोठा शस्त्रसाठा हस्तगत केला आहे.

पळसे गावातील पोलीसपाटील सुनील गायधनी यांनी डायल 112 वर कॉल करून गावात काही संशयित चोर फिरत असल्याची माहिती दिली. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना कळविण्यात आली. त्यानुसार त्यांनी आदेश दिल्यानंतर गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
ज्ञानेश्वर गायधनी यांच्या शेताजवळ संशयित व्यक्तींचा शोध घेत असताना पाच जण पळून जाताना दिसले. पोलिसांनी पाठलाग करत रविकुमार भोई (वय 27, रा. मराठी मंदिर झोपडपट्टी, अंबरनाथ, जि. ठाणे), शिवा विक्रम वैदू (36, रा. आनंदनगर, जळगाव), विष्णू शंकर भोई (30, रा. टायगर गाव, कल्याण फाटा, जि. ठाणे), आकाश गोपाळ वैदू (वय 38, रा. पाण्याच्या टाकीजवळ, पाचोरा, जि. जळगाव) यांना ताब्यात घेतले. त्यांचा एक साथीदार श्याम विष्णू भोई (रा. आसवनी कॉलनी, सामनगाव रोड, नाशिक) अंधाराचा फायदा घेत पळून गेला.
ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून 28 धारदार चाकू, एक कोयता, मिरचीपूड व दोरी असा दरोड्यासाठी वापरण्यात येणारा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हे सर्व आरोपी संभाव्य दरोड्याच्या तयारीत असल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार विशाल बाळकृष्ण पाटील यांनी फिर्याद दिल्यावर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तपास करत आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, सपोनि प्रवीण सूर्यवंशी, सपोनि किरण कोरडे, उनि संदीप पवार, हवालदार अविनाश देवरे, विशाल पाटील, पोशि नितीन भामरे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, सागर आडणे, विशाल कुवर, समाधान वाजे, धीरज बिडकर, चापोशि योगेश रानडे व निखिल कुन्हे यांनी केली.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 hour ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 hour ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 hours ago