शहरातून पुन्हा चार दुचाकी चोरीस
नाशिक : वार्ताहर पुन्हा एकदा चार दुचाकी चोरी झाल्याच्या घटना शहर परिसरातील अंबड , उपनगर , मुंबई नाका , गंगापूर आदी पोलीस ठाणे हद्दीत घडल्या आहेत . पहिली घटना सिडकोतील उपेंद्रनगर भागात घडली . अंबडगावातील दीपक उत्तम मुंडावरे हे मंगळवारी ( दि . १२ ) दुपारी उपेंद्रनगर भागात गेले होते . गणपती मंदिराजवळ पार्क केलेली दुचाकी क्रमांक एमएच १५ इक्यू ५१ ९९ रट्यांनी चोरून नेली . याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . पुढील तपास पोलीस नाईक परदेशी करीत आहेत . दुसरी घटना उपनगर पोलिसांच्या हद्दीत घडली . हितेश बलबीररॉय नैयर ( ५६ उपचार केंद्रासमोर , जयभवानी रोड ) यांची ज्युपिटर एमएच १५ जीएच ३८२५ गेल्या शुक्रवारी ( दि . ८ ) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली . याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . पुढील तपास पोलीस नाईक शेख करीत आहेत . तिसरी घटना मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली . सुनील विश्वनाथ कुलकर्णी ( रा . वृंदावन कॉलनी ) हे गेल्या बुधवारी ( दि . ६ ) सायंकाळच्या सुमारास बोधलेनगर भागात गेले होते . क्रोमा शोरूम परिसरातील एसबीआय बँकेशेजारी एमएच १५ डीवाय ७०५४ पार्क केली . अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली . याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . पुढील तपास पोलीस नाईक शिंदे करीत आहेत . चौथी घटना गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली . उंटवाडीतील सिटीसेंटर मॉल भागात घडली . प्रकाश अशोक कचरे ( रा . गोदावरीनगर , गंगापूरगाव ) यांची पल्सर एमएच १५ जीबी ५४८ ९ मंगळवारी ( दि . १२ ) सिटी सेंटर मॉल पाठीमागील स्टॉफच्या पार्किंगमध्ये लावलेली असताना चोरट्यांनी ती पळवून नेली . याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . पुढील तपास पोलीस नाईक परदेशी करीत आहेत .
नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…
खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…
दक्षिण आशियातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा बदल घडला आहे. बांगलादेशमधील नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीत दीर्घकाळ…