नाशिक

वन्यप्राण्यांमुळे दोन वर्षांत चौघांचे बळी

नाशिक पश्चिम विभागातील स्थिती; नऊ जण जखमी

नाशिक ः प्रतिनिधी
मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढला आहे. शेतकरी किंवा लहान मुलांना बिबट्याच्या हल्ल्यात मनुष्यहानी किंवा जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. बिबट्या किंवा इतर प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी किंवा मृत पावल्यास वन विभागाकडून नुकसानभरपाई देण्यात येते. नाशिक पश्चिम वन विभागात गेल्या दोन वर्षांत नऊ जण जखमी, तर चार जण मृत्युमुखी पडले आहेत.त्यांपैकी मृतांमध्ये एकाच्या वारसाला, तर जखमीत दोघांना कागदपत्रांच्या अभावामुळे नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागले आहे.

वाघ, बिबट्या, अस्वल, रानगवा, रानडुक्कर, हत्ती, कोल्हा, लांडगा, मगर व माकड आदींच्या हल्ल्यामुळे मानवी हानी झाल्यास नुकसानभरपाई दिली जाते. मृत झालेल्यांना 25 लाख भरपाई दिली जाते, तर जखमींना पाच लाख रुपये नुकसानभरपाई दिली जाते. सन 2024-25 मध्ये दिंडोरी येथील एकजण, 2025-26 मध्ये दिंडोरीत एक महिला, एक मुलगा व एक व्यक्ती मृत पावले. त्यांच्या वारसांना प्रत्येकी 25 लाखांची नुकसानभरपाईची रक्कम देण्यात आली. सन 2024-25 मधील अर्जदाराचे कागदपत्र पूर्ण नसल्याने भरपाई मिळालेली नाही. जखमी नऊ जणांत आतापर्यंत दोघांंना कागदपत्रांअभावी नुकसानभरपाई मिळालेली नाही. उर्वरित सात जणांना एकूण सहा लाख 13 हजार 984 रुपये नुकसानभरपाई मिळाली आहे. जखमी दिंडोरी, ताहाराबाद, देवळा व उंबरठाण येथील असून, सर्व बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत.
शासनाने वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणार्‍या मानवी व पशुधन नुकसानीसाठी भरपाईचे दर निश्चित करणारी अधिसूचना जारी केली आहे. नुकतीच महसूल व वन विभागाने 1 फेब्रुवारी रोजी राजपत्रात ही अधिसूचना प्रसिद्ध केली असून, महाराष्ट्र वन्यप्राण्यांमुळे झालेली हानी, इजा किंवा नुकसान यांकरिता भरपाई प्रदान करणे अधिनियम-2023 अंतर्गत हे दर लागू करण्यात आले आहेत. यात माणसाच्या मृत्यूसाठी 25 लाख रुपये, तर पशुधनासाठी कमाल 70 हजार रुपये दर आहे. शासनाच्या या निर्णयामुळे वन्यप्राणी हल्ल्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या नुकसानभरपाईसाठी लाभार्थ्यांनी संबंधित वन विभागाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मृत्यू झाल्यास वारसांना 25 लाख भरपाई 

वन्यप्राण्यांत वाघ, बिबट्या, अस्वल, रानगवा, रानडुक्कर, हत्ती, कोल्हा, लांडगा, मगर, माकड आदींच्या हल्ल्यामुळे मानवी हानी झाल्यास पुढीलप्रमाणे नुकसानभरपाई दिली जाते.

मानवी मृत्यू :                        25 लाख रुपये
कायमस्वरूपी दिव्यांगत्व :     7.50 लाख
गंभीर इजा :                           पाच लाख
किरकोळ इजा :                      खासगी रुग्णालयात उपचार खर्च किंवा 50 हजार यांपैकी कमी असलेली रक्कम

Gavkari Admin

Recent Posts

मराठी माणूस, ठाकरे ब्रँडमुळे सरकार झुकले

खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्‍यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…

2 hours ago

जिल्ह्यातील धरणांतून 1,44,053 क्यूसेक विसर्ग

धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…

2 hours ago

रेल्वे थांबवणार्‍यांकडून 42 हजारांचा दंड वसूल

चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…

2 hours ago

…तर अभिजात मराठी ज्ञानभाषा, जनभाषा

सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…

2 hours ago

दागिन्यांसाठी महिलेची हत्या

पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…

3 hours ago

कालव्यात फेकलेल्या कचर्‍यामुळे आरोग्य धोक्यात

अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…

3 hours ago