फॉर्च्युनर, इर्टिगा आणि ट्रकचा समावेश; तासभर वाहतूक ठप्प
सिन्नर : प्रतिनिधी
नाशिक- पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात गणपती मंदिर परिसरात रविवारी (दि.4) सायंकाळी सुमारे सात वाजेच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाच्या बससह चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातामुळे नाशिक- सिन्नर मार्गावरील एका बाजूची वाहतूक तासभर ठप्प झाली होती.
राज्य परिवहन महामंडळाची महाबळेश्वर- नाशिक बस (एमएच 14- बीटी 3110) नाशिककडून सिन्नरच्या दिशेने जात असताना पुढे चालणार्या फॉर्च्युनर कारला पाठीमागून धडकली.
या धडकेने फॉर्च्युनर कार पुढील ट्रकवर आदळली.
दरम्यान, फॉर्च्युनरच्या बाजूने जाणार्या इर्टिगा कारला (एमएच 15- जेएच 8765) देखील बसचा धक्का लागला. या साखळी अपघातात एसटी बसच्या दर्शनी भागाचे तसेच फॉर्च्युनर कारच्या पाठीमागील भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. चार वाहने एकमेकांवर धडकल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांसह शिंदे टोल प्लाझा येथील मदत पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Four vehicles including ST bus involved in accident at Mohdari Ghat
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…