टाकेदजवळ पिकअप उलटून चार महिला जखमी

वासाळी : वार्ताहर
इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथे ऋषीपंचमीनिमित्त आलेल्या मालेगाव येथील महिला भाविकांची टाकेद – जोशीवाडी येथे पिकअप गाडी उलटून एक महिलेचा पाय मोडला, तर तीन महिला किरकोळ जखमी झाल्या.
मालेगाव येथील (एम. एच. 15 डी. के. 7640) या पिकअपने 15 ते 20 महिला टाकेद येथील जटायू तीर्थक्षेत्री स्नान, पूजा व देवदर्शनासाठी आल्या होत्या. स्नान, पूजा व देवदर्शन घेऊन सदर भाविक महिला खेड येथील भैरवनाथाचे दर्शन घेण्यासाठी जात असताना टाकेद खुर्दच्या जोशीवाडीजवळील गायकवाड यांच्या वस्तीजवळ रस्त्याला पडलेले खड्डे व त्यातच समोरून जनावरे आल्याने त्यांना वाचवताना सदर पिकअप गाडीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने सतत पडणार्‍या पावसामुळे सदरची पिकअप गाडी शेतात उलटून चाके वर झाली व आतील महिलांना यामुळे बराच मुक्का मार लागला. तर एका महिलेचा पोटरीजवळ पाय मोडल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. किरकोळ जखमींना मलमपट्टी करून व पाय मोडलेल्या महिलेला ताबडतोब पुढील उपचारासाठी एस.एम.बी.टी. हॉस्पिटल धामणगाव येथे पाठविण्यात आले.
हा अपघात झाल्यानंतर त्वरित टाकेद खुर्दचे पोलीसपाटील शरद निर्मळ, सुरेश जगदाळे, गोरख जगदाळे, टाकेद बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते रतन नाना बांबळे, युवराज क्षीरसागर, चेतन परदेशी यांनी जेसीबी आणून गाडी सरळ करून त्यांना व अपघातग्रस्त रुग्णांना त्वरित मदत करण्यात आली.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 days ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 days ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 days ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 days ago