महाराष्ट्र

मनगटाचे फ्रॅक्चर …!*

डॉ. संजय धुर्जड.*
अस्थिरोग तज्ञ, सुदर्शन हॉस्पिटल,
नाशिक. 9822457732

 

मानवी शरीराचा हात खूप काही करू शकतो. रांगोळी, चित्रकार, नृत्य, जादूगरी यांसारख्या कलाविष्कार घडवतो, लिखाण करतो, हातवारे करून इशारे करतो, नजकातीचे विणकाम करतो,  आपले मनगट खूप वैशिष्ट्यपूर्ण असते. जे सांधे स्थिर असतात त्यामध्ये लवचिकता कमी असते, आणि ज्या सांध्यांमध्ये लवचिकता जास्त असते तिथे स्थिरता कमी होते. परंतु मनगटात दोन्हींची गरज असते, म्हणून या सांध्याची रचना वैशिष्ठ्यपणे केली आहे. काम करण्यासाठी लवचिकता तर हवी असते, परंतु त्याच सोबत सांधा स्थिर ही असायला हवा. हे सर्व कसे शक्य होते, ते आज आपण बघणार आहोत. यासाठी मनगटाची रचना समजून घेऊया आणि त्याचे काही विकार ही बघूया.
कोपऱ्याच्या संध्यापासून मनगटापर्यंतच्या हाताच्या भागात दोन हाडे असतात, एक रेडियस आणि दुसरे अलना. या दोन्ही हाडांच्या खालच्या टोकाला एकूण आठ छोटे छोटे हाडे एकमेकांना जोडून मनगटाचा सांधा तयार होतो. चिंचोका किव्हा बारीक सुपारीच्या आकाराचे आठ हाडे चार-चार च्या दोन रांगेत जोडलेली असतात. अंगठ्याच्या बाजूने पहिल्या रांगेत स्कॅफॉईड, ल्युनेट, ट्रायक्वेट्रम, पीसीफॉर्म, तर दुसऱ्या रांगेत ट्रॅपेझियम, ट्रॅपेझोईड, कॅपीटेट आणि हॅमेट अशा प्रकारे जोडलेले असतात. त्यापुढे मग तळहाताच्या प्रत्येक बोटाचे एकेक असे पाच हाडे जोडलेले असतात. या वैशिष्ठ्यपूर्ण रचनेमुळे प्रत्येक छोटे हाड एकमेकांवर सुरळीतपणने सरकून लवचिकता वाढवते. आठही दिशांना, तसेच गोलाकार वर्तुळी हालचाल करता येते.
जेव्हा आपण पडतो किव्हा आपल्याला स्वतःचा बचाव करायचा असतो तेव्हा आपले हातच पूढे जातात. यामुळे हाताला (मनगटाला) इजा होण्याची शक्यता वाढते.  या आठपैकी प्रत्येक हाडाला फ्रॅक्चर होऊ शकते, तसे यांतील प्रत्येक छोटा सांधा निखाळू शकतो. परंतु, या सर्व प्रकारांपैकी काही प्रकारचे फ्रॅक्चर्स व डीसलोकेशन जास्त प्रमाणात आढळतात. त्यातील काही निवडक व नियमितपणे होणाऱ्या इजांबद्दल जाणून घेऊया.
*स्कॅफ़ॉईड फ्रॅक्चर*
अंगठ्याच्या बाजूने पहिल्या रांगेतील हे हाड, एखाद्या छोट्या काजूच्या आकाराचे असते. मनगटाच्या सांध्याशी
संलग्न असलेल्या या हाडाचे फ्रॅक्चर होण्याचे प्रमाण इतर ७ हाडांच्या मानाने सर्वात जास्त असते. थांप्स-अप केल्यावर मनगटाच्या ठिकाणी अंगठ्याच्या दिशेने जाणाऱ्या दोन शिरांच्या मध्ये हे हाड असते. हातावर पडल्यानंतर स्कॅफॉईड फ्रॅक्चर होऊ शकते. मनगटात वेदना होतात, आणि विशेषतः या दोन शिरांच्या मधोमध दाब दिल्यास वेदना वाढतात. अशा वेळी हे हाड फ्रॅक्चर आहे असे निष्पन्न होते. निदानाची पुष्टी एक्स-रे च्या साह्याने केली जाते. एक्स-रे मध्ये काजूच्या आकाराच्या हाडाला फ्रॅक्चर झालेले दिसते. फ्रॅक्चर सुरवातीच्या, मधल्या अथवा पुढील भागात असू शकते. त्यानुसार त्याचे उपचार ठरतात.
स्कॅफॉईड फ्रॅक्चर जुळण्यासाठी वेळ लागतो म्हणून ते लक्षवेधी फ्रॅक्चर आहे. फक्त तडा गेलेला (हेअर लाईन फ्रॅक्चर) असेल तर त्याला प्लास्टर करून हाड जुळेपर्यंत एकाच अवस्थेत ठेवले जाते. साधारणपणे ८ ते १० आठवड्यात हाड जुळते. फ्रॅक्चर होऊन त्यात गॅप असेल तर हल्ली मशीनमध्ये बघून हाड जागेवर आणून छोट्या छिद्रातून एक स्क्रू टाकला जातो, व प्लास्टर केले जाते. प्लास्टर काढून व्यायाम सुरू केला जातो. काही वेळा हे फ्रॅक्चर दुर्लक्षित होते. लक्षात येत नाही. नंतर फ्रॅक्चर झालेले हाड जागेवरून सरकते, म्हणून वेदना सुरू होतात. दोन – चार आठवडे झालेले असल्यास त्याला टाक्याचे ऑपरेशन करून हाड जागेवर आणून स्क्रू टाकला जातो. काही महिने जुने फ्रॅक्चर असल्यास त्याला इतर ठिकाणचे हाड काढून त्याचे फ्रॅक्चरच्या ठिकाणी प्रत्यारोपण करून, स्क्रू टाकून फिक्स केले जाते. अशा वेळी किमान १० -१२ आठवडे प्लास्टर ठेवले जाते. हाड जुळल्यानंतर व्यायाम करणे खूप गरजेचे असते. मनगटाची हालचाल सुरळीत व संपूर्ण व्हावी याकरिता फिजिओथेरेपिस्ट तज्ञांच्या मदतीने आणि मार्गदर्शनाखाली हे व्यायाम केल्यास अधिक चांगले रिझल्ट मिळतात.
*
Devyani Sonar

Recent Posts

कांद्याचे भाव गडगडणार

कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…

21 hours ago

यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल

यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…

23 hours ago

वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही….

  वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…

2 days ago

मृत्यू पश्चातही आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच

मृत्यू नंतरही  आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…

2 days ago

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाचे आज अधिवेशन

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त  आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…

2 days ago

त्र्यंबकेश्वर श्रावणी सोमवारी भाविकांसाठी रा. प.कडून 33 जादा बसेसची सोय

नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…

2 days ago