महाराष्ट्र

सुनार का कचरा बादामसे महंगा!

कचर्‍यातून मिळणार्‍या सोन्यावर झारेकर्‍यांची गुजराण
नाशिक ः देवयानी सोनार
शहरातील सराङ्ग बाजार,स्मशानभूमी,गोदाघाट,अस्थिविसर्जन,नदीकाठ आदी ठिकाणी मिळणारे सोने, पैसे,नाणी शोधून त्यावर गुजराण करणार्‍या झारेकरी समाज अजूनही हलाखीचे जीवन जगत असल्याचे चित्र आहे.कचर्‍यातून अनुभव आणि कौशल्यातून सोने काढले जाते. सोने शोधण्यात झारेकरी समाज तरबेज आहे.
झारेकरी समाजाला ऐतिहासिक पार्श्‍वभूमी आहे. मात्र, काळानुरुप या समाजाची फारशी प्रगती झाली नाही. शिक्षणाचा अभाव आणि शासकीय योजनांची माहिती नसल्याने समाजाच्या नशिबी उपेक्षितांचे जीणं आले आहे.
सुनार का कचरा बादामसे महंगा असे म्हटले जाते. त्यामुळे या कचर्‍यातून सोने शोधून झारेकरी समाज गुजराण करीत असतो. झारेकरी समाजाच्या पहिल्या पिढीकडे जिल्हाधिकार्‍यांनी दिलेले ओळखपत्र आहे. सद्या मात्र, असे कोणत्याच प्रकारचे ओळखपत्र दिले जात नाही.अशी खंत झारेकरी चंदू गावडे यांनी व्यक्त केली.
झारेकरी हे मुळतः ओडीशा पं.बंगाल येथील आहेत. पिढीजात हाच व्यवसाय असल्याने अनुभवातून कौशल्याने सोने नाणे काढण्याचे काम केले जाते. अनुसूचित जाती जमातीमध्ये हा समाज मोडतो. 100 ते 150 वर्षापूर्वीची झारेकर्‍यांची पहिली पिढी नाशिकमध्ये वास्तव्यास आहे. संपूर्ण भारतभर समाज पसरलेला आहे.नाशिकमध्ये मखमलाबाद परिसरात 15 ते 20 कुटुंब आहे. सर्व मिळून जवळपास 70 ते 100 जण परिवारात असून कुटुंबातील प्रत्येकजण याच व्यवसायात आहे.शिक्षणाचा अभाव असल्याने मिळणार्‍या सवलती,लाभ यापासून अनभिज्ञ असल्याने परिस्थिती बदललेली नाही.आताची पाचवी,सहावी पिढी सराङ्ग बाजारातील कचर्‍यातून सोने शोधण्याचे काम करतात.काही नदीतील मिळालेले पैसे,सोने मिळवतात. स्मशानातील सोने पैसे शोधण्याचे काम करतात.अनेकदा नदीतील सोने पैसे काढण्यासाठी एका गावातून दुसर्‍या गावात शोध घेण्यासाठी जावे लागते परंतु स्थानिकांना झारेकरींचा परिचय नसल्याने चोर किंवा उपद्रव करणारे समजून हाकलून दिले जाते.त्यामुळे ओळखपत्र मिळावे अशी अपेक्षा आहे. सराङ्ग बाजारातून सोनाराकडून दुकानामधील कचरा पाचशे हजार रुपयांना विकत घेतला जातो.दुकानाबाहेरील कचरा झारेकरी महिला झाडू मारून कचरा गोळा करून त्यातून सोने काढले जाते.

नेर्‍यातून असे मिळवतात सोने

सराफी दुकानातील आणि बाहेरील कचरा गोळा केला जातो. बारीक ब्रशने सर्व परिसर झाडला जातो. झारेकरी मिळालेला कचरा पाण्यात टाकून धुतात. मातीत घोळून घोळून दगड,माती रोळली जाते. सोन्याचे,चांदीचे कण गोळी स्वरूपात शिल्लक राहतात.हे जमा झालेले कण एकत्रीत करून पुन्हा सोनाराकडे विकतात.दररोज 150 ते 200 मिली सोने सापडले जाते.दिवाळीत 500 मिली ते 1 ग्रॅमपर्यंत सोने सापडते.दररोज तीनशे ते पाचशे रुपये झारेकरी महिलांना मिळतात. शहरातील गोदाघाट वा इतर नदीकिनारी वाळूतून सोने,सुटे पैसे,नाणी काढले जातात. स्मशानभूमीत मृतकांच्या अंगावरील सोने,पैसे काढण्याचे काम केले जाते.

प्राचीन नाण्यांना इतिहास अभ्यासामध्ये महत्वाचे साधन मानले जाते.झारेकरी जमात नदीतून किंवा इतर ठिकाणाहून नाणी काढण्याचे काम करीत असतात. इतिहासजमा झालेले संस्कृती राजघराणे राजवाडे यासाठी पूरक असतात. त्यामुळे महत्वाची कामगिरी करणार्‍या झारेकर्‍यांना योग्य तो सवलती मिळाव्यात जेणे करून जास्त काम करून ऐतिहासीक वारसा शोधण्यास मदत होईल. हा समाज अशिक्षीत असल्याने अनेक अडचणी येतात. त्यामुळे शासनदरबारी योग्य ती दखल घेण्यात यावी
झारेकर्‍यांमुळे अनेक जुन्या नाण्यांचा शोध लागला आहे. झारेकरी सराफी दुकानातील आणि बाहेरील कचरा गोळा करून त्यापासून सोने मिळवतात. यांची पिढी अजूनही पारंपरिक व्यवसायात आहे. अल्प समाज असून अशिक्षित आहे.
चेतन राजापूरकर (सराङ्ग व्यावसायिक,इंडिया बुलियन ऍन्ड ज्वेलर्स असोसिएशन)

आमची पिढी अशिक्षीत असून पूर्वी आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ओळखपत्र दिले जात होते. परंतु नंतरच्या पिढीकडे कोणतेही ओळखपत्र नाही.त्यामुळे काम करतांना अडचणी येतात.मुलांची मुले शिक्षण घेत आहेत.ओळखपत्र किंवा इतर सवलती बाबत समाजाकडे माहिती नाही.मागण्या हक्कांसाठी लढण्यासाठी आर्थिक पाठबळ आणि माहिती नसल्याने अडचणी येत आहेत. न्याय हक्कासाठी प्रयत्न केले परंतु महिती नसल्याचा गैरङ्गायदा घेतला जात आहे.

चंदू गावडे, झारेकरी

 

 

 

 

 

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

लैंगिक अत्याचार करणार्‍या दोघा फरार आरोपींना अटक

सातपूर : प्रतिनिधी पीडित तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊन मॅक्स कॅफे तसेच आई-वडील घरी नसताना…

3 minutes ago

प्रकाश लोंढेच्या जामीन अर्जावर 26 मेस सुनावणी

सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर येथील ऑरा बारमधील गोळीबार आणि खंडणी प्रकरणातील मुख्य संशयितांच्या अडचणी…

10 minutes ago

अंबडमध्ये कचराकुंडीत नवजात अर्भक फेकले, नागरिकांत संताप

सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावातील एका शाळेजवळील कचराकुंडीत मृत अर्भक आढळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी…

17 minutes ago

सुचितानगरला घरफोडीत 36 लाख लंपास

सिडको : विशेष प्रतिनिधी येथील सुचितानगर परिसरातील बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोने, चांदी, हिर्‍यांचे…

23 minutes ago

लाच स्वीकारताना एकाच वेळी आठ जण रंगेहाथ ताब्यात

नाशिक: प्रतिनिधी सागाचे झाड तोडून त्याची विक्री करण्याची परवानगी देण्याच्या मोबदल्यात 11,500 रुपयांची लाच स्वीकारताना…

27 minutes ago

कत्तलीसाठी जाणारे वाहन पकडले

गुन्हेशोध पथकाची कामगिरी; 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त पंचवटी : प्रतिनिधी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर…

32 minutes ago