उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सिडको/ नाशिकरोड: विशेष प्रतिनिधी
हिर्यांचे दागिने कमी दरात मिळवून देण्याचे आमिष दाखवून पुणे येथील व्यावसायिकाची तब्बल एक कोटी बाहत्तर लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सतीश श्याम पंजाबी (वय 43, रा. लुल्लानगर, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी गोपाल पेस्सुमल अहुजा, लक्ष्मी गोपाल अहुजा (रा. नाशिक) आणि सागर गोपाल अहुजा (सध्या अमेरिका) यांनी जानेवारी 2025 ते 17 एप्रिल 2025 दरम्यान संगनमत करून फिर्यादीकडून फ्रेंचायजी व्यवसायाच्या नावाने हिर्यांचे दागिने कमी दरात मिळवून देण्याचे सांगत विश्वास संपादन केला.
या प्रकरणात फिर्यादीकडून हिरेजडीत व सोन्याचे दागिने घेतले. तसेच, सागर आहुजा याच्या माध्यमातून दिलेल्या दोन चेकांवर बनावट सह्या करून प्रत्येकी 10 आणि 30 लाखांचे चेक वटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकारातून एकूण दीड कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक झालेली नसुन पुढील तपास उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक
फुलपगारे आणि पोहवा इम्रान नजीर शेख यांचे पथक काम करीत आहे.
बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…
ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…
शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…
मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…
वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…
मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांची…