नाशिक

मोफत अंत्यसंस्कार निविदेला चाल

महासभेच्या मंजुरीसाठी प्रस्ताव ठेवला जाणार

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेतर्फे शहरात मरण पावलेल्या व्यक्तींवर मोफत अंत्यसंस्कार केले जातात.
महापालिकेने सर्वधमीर्र्यांसाठी ही योजना आणली असून, सन 2003 पासून ही मोफत अंत्यसंस्कार योजना राबवली जात आहे. दरम्यान, या ठेक्याची मुदत साडेतीन महिन्यांत संपुष्टात येत असल्याने महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून निविदा प्रक्रियेची तयारी सुरू झाली आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करून महासभेच्या मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.
शहरातील अमरधाममध्ये मोफत अंत्यसंस्कार करण्यासाठी महापालिका प्रशासन कोट्यवधीचा खर्च करत असते. गतवेळी मोफत अंत्यसंस्काराचा ठेका सात कोटी 42 लाखांना देण्यात आला होता. यंदा मात्र या निविदेत वाढ होण्याची शक्यता आहे. शहरातील सर्वधमीर्र्य नागरिकांच्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य आणि सेवा मोफत उपलब्ध करून दिली जाते. 17 जानेवारी 2024 मध्ये तीन वर्षांकरिता निविदा देण्यात आली होती. हा ठेका येत्या 17 जानेवारी 2027 ला संपुष्टात येत आहे. शहरातील पंचवटी, नाशिकरोड, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, सिडको आणि सातपूर या सहाही विभागांतील अमरधाममध्ये पार्थिवावर मोफत अंत्यसंस्कार केले जातात.
या योजनेसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोट्यवधीची तरतूद केली जाते. मध्यंतरी ही योजना फक्त दारिद्—यरेषेखालील कुटुंबांसाठीच असावी यादृष्टीने प्रशासनाकडून विचार सुरू होता. महापालिका हद्दीत सव्वीसहून अधिक ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी मोफत साहित्य उपलब्ध करून दिले जाते.

फक्त नाशिकमध्येच मोफत अंत्यसंस्कार
मोेेफत अंत्यसंस्कारासाठी महापालिकेवर कोट्यवधींचा भार पडत आहे. राज्यातील इतर कुठल्याही महापालिकेने मोफत अंत्यसंस्कार योजनेची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे नाशिक महापालिकेची सरसकटऐवजी केवळ दारिद्रयरेषेखालील कुटुंबांसाठीच ही योजना असावी, अशी मागणी होत आहेे.

Free funeral invitation

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

17 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

17 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

17 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

17 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

17 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago