गर्भाशयमुखाचा कर्करोग टाळण्याचे मोठे पाऊल
नाशिक : प्रतिनिधी
महिलांमध्ये गर्भाशयमुखाचा कर्करोग झपाट्याने वाढत असून, हा स्तन कर्करोगानंतर देशातील दुसर्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कर्करोग ठरतो, हा कर्करोग मुख्यतः ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) संसर्गामुळे होतो, जो लैंगिक संपर्काद्वारे पसरतो. शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण करून हा कर्करोग टाळण्यासाठी एचपीव्ही लस अत्यंत प्रभावी ठरते आणि 99 टक्के धोका कमी करते.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व मुंख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यात 14 व 15 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींना एचपीव्ही लस मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. अंदाजे 10,400 पात्र मुलींना या मोहिमेचा लाभ मिळणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, एचपीव्ही लस 90 टक्क्यांपेक्षा अधिक प्रभावी असून, एचपीव्ही 16 व 18 या विषाणूंच्या प्रकारांपासून संरक्षण देते. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून 2006 पासून जगभरात 50 कोटींहून अधिक डोस देण्यात
आले आहेत.
लसीकरण जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्था, आयुष्मान भारत अंतर्गत कार्यरत आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये होईल. लाभार्थी मुलींची नोंदणी यू विन पोर्टलवर डिजिटल पद्धतीने होईल आणि लसीकरण झालेल्या मुलींना डाव्या हाताच्या बोटावर मार्किंग केले जाईल. मोहीम ऐच्छिक असून, पालकांच्या लेखी संमतीनंतरच लस दिली जाईल.
शासनाच्या या पुढाकारामुळे किशोरवयीन मुलींना गंभीर आजारापासून संरक्षण मिळेल. डॉ. हर्षल नेहेते, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी यांनी पालकांना आवाहन केले की, गैरसमज न करता आपल्या मुलींचे लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. ही मोहीम पुढील तीन महिन्यांपर्यंत सलग चालवून नियमित लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट केली जाणार आहे.
Free HPV vaccine for teenage girls
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…