नाशिक

रमजाननिमित्त मनमाडला खाण्यापिण्याच्या पदार्थांची रेलचेल

मुस्लिम बांधवांची खरेदीसाठी गर्दी; तुलनेत वस्तूंच्या किमती ‘जैसे थे’

मनमाड : प्रतिनिधी
मुस्लिम धर्मीयांचा सर्वांत मोठा सण म्हणजे पवित्र रमजान महिनाभर उपवास करून रमाजन ईद उत्साहात साजरी करण्यात येते. यावेळी शिरखुर्मा हा खास पदार्थ मुस्लिम धर्मीय यांच्यासह इतर धर्मीयांच्याही तितक्याच पसंतीचा आहे. रमजानच्या उपवासाच्या निमित्ताने फळे व इतर खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणावर रेलचेल असते. शहरातील बाजारपेठ विविध खाण्यापिण्याच्या दुकानांनी सजली आहे. सायंकाळी उपवास सोडण्याच्या वेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी बघावयास मिळते. समोसे, कबाब, कचोरी, शिग यांसह इतर नॉनव्हेज पदार्थ मोठ्या प्रमाणावर असतात.
मुस्लिम धर्मातील सर्वांत मोठा सण म्हणजे रमजान ईद. रमजान ईदनिमित्त महिनाभर कडक उपवास केले जातात. यात पहाटे सहेरी केली जाते. दिवसभर काही न खाता-पिता (पाणीदेखील नाही) उपवास करून सायंकाळी इफ्तारी अर्थात उपवास सोडण्यात येतो. यासाठी विविध प्रकारचे फळे यांसह चिकन रोल, समोसे कबाब यांसह विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी येतात.
सध्या या दुकानांनी बाजारपेठ सजली असून, शहरातील नगीना मशीद, जामा मशीद यांसह इतर ठिकाणी खाद्यपदार्थ दुकाने लागली आहेत. यानंतर रमजान ईदच्या दिवशी जो शिरखुर्मा बनवला जातो. यासाठी लागणारे साहित्यदेखील विक्रीसाठी आले असून, याचीदेखील दुकाने लागली आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाळा चांगला झाला आहे. त्यामुळे बाजारपेठेमध्ये तेजी आहे. याशिवाय, नांदगाव तालुक्यात परिस्थिती चांगली आहे. बाजारात गर्दीदेखील आहे. याशिवाय, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाही रमजाननिमित्त लागणार्‍या सर्वच वस्तूंच्या किमती जैसे थे आहेत. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असून, व्यवसायातदेखील
तेजी आहे.
– मतीन मन्सुरी, व्यावसायिक

असे आहेत भाव

शेवया – 160 किलो
सुतरफेणी – 160 किलो
रोट – 120 किलो
खजूर – 100 ते 250 किलो
सरबत – 160 लिटर
नान पाव – 30 ते 60 (2 नग)
फालुदा – 60 (1 नग)
चिंच आणि पुदिना चटणी – 70 रुपये बॉटल (1 नग)

A line of food and drinks awaits Manmad on the occasion of Ramadan

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

6 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

6 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

6 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

6 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

7 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

7 hours ago