नाशिक

मंदिरे फोडून चोरी करणारी टोळी गजाआड

तीन सराईत गुन्हेगार अटकेत, मंदिर चोरीचे 7 गुन्हे उघडकीस, पितळी वस्तू व 1238 ग्रॅम चांदी हस्तगत

सिन्नर : प्रतिनिधी
मंदिरे फोडून चोरी करणारी टोळी नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली. या टोळीतील 3 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मंदिर चोरीचे 7 गुन्हे उघडकीस आले असून, 66 किलो वजनाच्या पितळी वस्तू, त्याचप्रमाणे 1238 ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात आली आहे.

नाशिक ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांचे पथक जिल्ह्यातील मंदिर चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करीत होते. नाशिक जिल्ह्यात गतवर्षी व चालू वर्षात सिन्नर, लासलगाव, निफाड, वाडीवर्‍हे पोलीस ठाणे हद्दीत मंदिर चोरीचे गुन्हे घडले होते. या मंदिर चोरीच्या गुन्ह्यांमध्ये आरोपी हे सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे डिव्हीआर मशीनदेखील चोरी करून चोरून घेऊन जात होते. यातील आरोपी हे गावातील पुरातन मंदिरांवर लक्ष केंद्रित करून मंदिरातील चांदी व पितळी धातूंच्या किमती वस्तू चोरी करत असे, तसेच चोरी केल्यानंतर घटनास्थळावर कोणताही पुरावा ठेवत नव्हते. मंदिर चोरी प्रकरणी ‘स्थागुशा’चे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने घटनास्थळावर मिळून आलेल्या तांत्रिक बाबींचे अचूक विश्लेषण करून मिळविलेल्या गुप्त माहितीच्या आधारे, सदरचे गुन्हे हे संगमनेर तालुक्यातील सराईत गुन्हेगारांनी केले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाकण एमआयडीसी पुणे व टिटवाळा (ता. कल्याण) परिसरातून सुयोग अशोक दवंगे (21, रा. हिवरगाव पावसा, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर), संदीप उर्फ शेंडी निवृत्ती गोडे (23, रा. टिटवाळा, सावरकरनगर, ओमकार सोसायटी चाळ, कल्याण), अनिकेत अनिल कदम, (21, रा. आरकेनगर, स्टार बिल्डर चाळ, ता. कल्याण, जि. ठाणे) यांना ताब्यात घेतले. तर संदीप किसन साबळे (रा. सोमठाणे मंदिर, पाचपट्टा, अकोले, जि. अहिल्यानगर) आणि दीपक विलास पाटेकर (रा. टिटवाळा, माउलीकृपा चाळ, कल्याण, जि. ठाणे) हे दोघे फरार झाले आहेत. ताब्यात घेतलेल्या तीन आरोपींनी सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 4, निफाड, वाडीवर्‍हे आणि लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एका मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली. वाडीवर्‍हे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्याप्रकरणी या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील आणखी चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, कर्मचारी नवनाथ सानप, विनोद टिळे, नवनाथ शिरोळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, संदीप नागपुरे यांच्या पथकाने ही
कारवाई केली.

मुद्देमाल केला हस्तगत

ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या कब्जातून 238 ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट, 1 किलो वजनाच्या दोन चांदीच्या प्लेट, 20 किलो वजनाचा पितळी कळस, 3 मोठ्या समई, मंदिरातील 6 पितळी घंटा, 1 छोटी पितळी समई, 1 पितळी घोडा, तसेच मंदिरांमधील पितळ व तांब्याच्या छोट्या वस्तू अशा सुमारे 66 किलो वजनाच्या पितळी वस्तू, 1238 ग्रॅम चांदी असा एकूण 1,93,290 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी टोळीप्रमुख

टोळीचा म्होरक्या सुयोग अशोक दवंगे हा सराईत गुन्हेगार आहे. तो सध्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या दुसर्‍या वर्षाला शिक्षण घेत होता. सदर आरोपी हे गुगल मॅपवर ग्रामीण भागातील पुरातन मंदिरे सर्च करून त्यांची पाहणी करून चोरी करत होते. तसेच यूट्यूबवर कुलूप तोडण्याचे व्हिडिओ बघून हायड्रोलिक कटरच्या सहाय्याने कुलूप कट करत असल्याचे उघडकीस आले आहे.

Gavkari Admin

Recent Posts

ठाकरे गटाच्या या बड्या नेत्यावर नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल

खासदार संजय राऊत यांच्यावर नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नांदगाव आमिन शेख शिवसेना उद्धव बाळासाहेब…

14 hours ago

मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने  आईने उचलले भयानक पाऊल

  मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने  आईने उचलले भयानक पाऊल शहापूर : साजिद शेख शहापूर…

19 hours ago

ट्रॅपची माहिती होती, तर सतर्क का केले नाही?

मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांना सवाल नाशिक : प्रतिनिधी पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी…

19 hours ago

साप्ताहिक राशिभविष्य

दि. 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 पुरुषोत्तम नाईक मेष : आप्तेष्टांच्या गाठीभेटी या सप्ताहात…

20 hours ago

महापालिका जिंकायचीय, वाद टाळून कामाला लागा

मंत्री गिरीश महाजन : सुनील बागूल, राजवाडे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश नाशिक ः प्रतिनिधी भारतीय…

20 hours ago

कांदा उत्पादकांवर ओढावणार आर्थिक संकट?

दक्षिण भारत, मध्य प्रदेशातील कांद्याच्या आवकेने भाव गडगडण्याची शक्यता लासलगाव : समीर पठाण गेल्या काही…

20 hours ago