46.41 टक्के साठा; पाणी जपून वापरण्याचे प्रशासनाचे आवाहन
नाशिक : प्रतिनिधी
अवकाळी पावसामुळे जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर नुकसानीला सामोरे जावे लागले असले, तरी गंंगापूर धरणाच्या पाणीपातळीत 2 टक्क्यांंनी वाढ झाली आहे.
सध्या गंगापूर धरणात 46.41 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. आठवड्याला साधारणत: 3 टक्के जलसाठ्याचा उपयोग जिल्ह्यासाठी करण्यात येतो. किमान एक आठवड्याचा पाणीसाठा गंगापूर धरणात वाढल्याने संभाव्य पाणीटंचाईवर तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
मे महिना उजाडताच दरवर्षी पाणीउपसा व बाष्पीभवनामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होतो. यामुळे मे महिन्यापासूनच जिल्हा प्रशासनाकडून धरणातील साठ्याचे नियोजन करण्यात येते. यंदा मे महिन्यात अवकाळीने कहर केल्याने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तीव्र पावसाने हजेरी लावली. नाशिकसह त्र्यंबकेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवकाळीचा पाऊस झाल्याने गंगापूर धरणाच्या पातळीतही वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी (दि. 16) धरण पातळीत 2 टक्क्यांंनी वाढ होऊन पाणीपातळी 46.41 टक्क्यांंवर गेली. गत आठवड्यात सोमवारी (दि. 12 मे) 44.96 टक्के पाणीपातळी नोंदवली गेली होती.
येत्या 27 मेपर्यंत मॉन्सून केरळमध्ये, तर महाराष्ट्रात साधारणत: 7 जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. मॉन्सून वेळेत दाखल झाल्यास धरणसाठ्यात वेगाने वाढ होऊ शकते. यामुळे पाणीटंचाईचे संकट दूर होण्यास मदत होईल. सध्या सर्वत्र अवकाळीने कहर केल्याने पावसाचे वातावरण आहे. ऐन मे महिन्यात अवकाळीने रौद्र रूप धारण केल्याने मे महिन्याचा उकाडा काही प्रमाणात नाहीसा झाला आहे.
यामुळे यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच धरणसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. गंगापूर धरण समूहातील काश्यपी, गौतमी गोदावरी, आळंदी या धरणांतील साठाही वेगाने कमी होत आहे. याचबरोबर दारणा, नांदूरमध्यमेश्वर व चणकापूर धरणातील साठाही कमी झाल्याने पाणी जपून वापरावे, असेे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
इंस्टाग्रामवरून ब्लॅकमेल; अल्पवयीन मुलीकडून लाखोंची वसुली - नाशिकरोड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल सिडको विशेष…
सटाण्यात रंगल्या महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्या सटाणा ः प्रतिनिधी स्वर्गीय माजी नगरसेवक दयाराम नाना सोनवणे यांच्या…
नाशिक रोड : विशेष प्रतिनिधी पहलगाम (जम्मू-काश्मीर) घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड रेल्वे स्थानकात दहशतवादी हल्ला…
पावसातही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नाशिक ः प्रतिनिधी भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या आक्रमणाला दिलेल्या सडेतोड प्रत्युत्तरामुळे देशभरात…
नांदगावच्या पोखरी जवळ भीषण अपघातात तीन ठार सहा गंभीर जखमी मनमाड : आमिन शेख :…
सुळेवाडी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस सिन्नर ः प्रतिनिधी सिन्नर शहरासह तालुक्यात शुक्रवारी (दि. 16) विजांचा कडकडाट,…