नाशिक

आला आला माझा गणराज आला!

लाडक्या बाप्पाचे मंगलमय वातावरणात आगमन

निर्बंधमुक्त वातावरणामुळे उत्साह
घरोघरी, आस्थापनांत, सार्वजनिक ठिकाणी प्रतिष्ठापना
गणेश भक्तांत उत्साह
सार्वजनिक मंडळांची संख्या वाढली
निवडणुकीतील इच्छुकांमुळे यंदाचा गणेशोत्सव दणक्यात

नाशिक : अश्‍विनी पांडे
ढोल ताशाच्या गजरात गणरायाचे मंगलमय वातावरणात घरोघरी आगमन झाले. त्याचप्रमाणे विविध सरकारी, निमसरकारी कार्यालयात गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. त्याचप्रमाणे सार्वजनिक गणेश मंडळाच्या बाप्पाचही धुम धडाक्यात  स्वागत करण्यात आले असून शहरात विविध ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळाचे बाप्पा विराजमान झाले आहेत. यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त असल्याने भाविकांमध्ये प्रचंड उत्साह जाणवत होता. तर शासनाने गणेशोत्वावरचे अनेक निर्बंधमुक्त केल्या गणेश भक्तांचा उत्साह व्दिगुणित झाला होता.  शहरात दिवसभर मंडळाच्या गणपतीची मिरवणूक काढत  बाप्पा विराजमान झाले. विधिवत पुजा आणि नैवेद्य दाखवत  बाप्पाचे मनोभावे स्वागत करण्यात आले. गणपतीच्या स्वागतासाठी अबालवृध्दांनी जय्यत तयारी केली होती. बच्चेकंपनीचा लाडका बाप्पा येणार असल्याने चिमुकल्यांचीही  बाप्पाच्या स्वागतासाठी लगबग सुरू होती. आता गणरायाचे आगमन तर झाले आहे मात्र  बाप्पाची दहा दिवस सेवा करण्यासाठी भक्तगण तयारी करत आहे. बाप्पाच्या आरतीसाठी रोज लागणार्‍या प्रसादासाठी भाविकांनी नियोजन करून ठेवले आहे. गणपती आगमनाच्या दिवशी पावसाने विश्रांती घेतल्याने बाप्पाच्या स्वागतासाठी अडथळे निर्माण झाले नाहीत.

गणपती मंदिरात भाविकांची गर्दी
 शहरातील विविध परिसरात असलेल्या गणपतीच्या मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.शहरात एकूण बारा गणपतीची मंदिरे आहेत. नवश्या गणपती, चांदीचा गणपती, ढोल्या गणपती, साक्षी गणपती , इच्छापुतीर्र् गणपती, बाबा गणपती, यासर्वच मंदिरात गणेशभक्तांनी दर्शनावाठी रिघ लावली होती. या मंदिरातही गणेश चतुर्थीनिमीत्त गणपतीची विधीवत पुजा करण्यात आली.

वाहन बाजाराचा टॉप गिअर
गणेशोत्वावाच्या शुभ मुहुर्तावर अनेक ग्राहकांचा  कल वाहन खरेदीकडे असतो. हीच बाब लक्षात घेत वाहन कंपन्याकडून गणेशोत्वाच्या निमित्ताने वाहन खरेदीवर सुट देण्यात येते. त्यामुळे काल शहरातील वाहन बाजाराला चांगलीच झळाली प्राप्त झाली होती. दुचाकीसह, चारचाकी वाहनांची नागरिकांकडून खरेदी करण्यात येत होती. इलेक्ट्रॉनिक वाहनांची मोठी क्रेझ सद्या असल्याने वाहन बाजारात इलेक्ट्रॉनिक्स वाहनांचा बाजार जोरात होता.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंच्या दुकानात ग्राहकांची गर्दी
वाहनाप्रमाणे मोबाइल फ्रीज, लॅपटॉप ,टीव्ही यासारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तु खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी इलेक्ट्रॉनिकस वस्तुंच्या दुकानात खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. विक्रेत्यांकडून विविध गॅझेटवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली होती.
हेही वाचा : माझा ‘बाप्पा’ मीच साकारणार!

आज दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन
गणपतीचे काल उत्साहात आगमन झाल्यानंतर बाप्पांचा पाहुचार करण्यात आला. आज दिड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे.  दिड दिवसाच्या बाप्पाला जड अंतकरणाने निरोप देण्यात येणार आहे. गणपतीच्या विसर्जनासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध परिसरात कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे विसर्जन स्थळी गर्दी होणार याची पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहेत.  तसेच नदी किनारी भाविकांनी गर्दी करू नये यासाठी नदी किनारी पोलीस बंदोबस्त असणार आहे. 

Ashvini Pande

Recent Posts

निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा शोध सुरू

शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…

15 hours ago

जिल्ह्यात शेतकर्‍यांचा कल सोयाबीनऐवजी मक्याकडे

जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…

15 hours ago

‘पैस’मधील आध्यात्मिक आणि जीवनविषयक शिक्षण

र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…

15 hours ago

कांदेनवमी ः एक विलक्षण खाद्ययोग

षाढातील कोसळणार्‍या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्‍या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…

15 hours ago

गंगापूर धरणातून विसर्ग वाढला; गोदावरीच्या पातळीत वाढ

नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…

15 hours ago

माजी नगरसेवक गिते, बोडके, दिवे, ताजणे भाजपमध्ये

शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…

15 hours ago