लासलगाव – पिंपळगाव बसवंत रस्त्यावर आगीत ओम्नी गाडी खाक

लासलगाव : वार्ताहर लासलगाव पिंपळगाव बसवंत रस्त्यावर असलेल्या कोटमगाव परिसरात बुधवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान मारुती ओमनी गाडीने अचानक पेट घेतल्याने संपूर्ण गाडी जळून खाक झाली आहे सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही . लासलगाव येथील रशीद शेख यांच्या मालकीची मारुती ओमनी गाडी नंबर एमएच १५ १८६३ लासलगाव कोटमगाव रोडवर गेले असता गाडीने अचानक पेट घेतल्याने या आगीत ओमनी गाडी संपूर्ण जळून खाक झाल्याची घटना घडली . सुदैवाने चालकाने गाडीखाली उतरत आपला जीव वाचवला . अपघातात संपूर्ण गाडी जळून खाक झाली आहे . घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मारुती ओमनी पेटण्याचे कारण काय याबाबत चौकशी सुरू केली आहे .

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

10 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

10 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

10 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

10 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

11 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

11 hours ago