ग्रामीण भागात 45 दिवसांनी तर शहरात 25 दिवसांनी उपलब्ध होणार
मुंबई :
पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता भारतीय स्वयंपाकघराला बसत आहे. याच पार्श्वभूमीवर एलपीजी गॅस पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या वातावरणात केंद्र सरकारने सिलिंडर बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. नव्या नियमानुसार, ग्रामीण भागात आता 45 दिवसांनंतरच एलपीजी सिलिंडर बुक करता येणार आहे, तर शहरी भागात 25 दिवसांचे अंतर ठेवून बुकिंग करता येईल. केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी संसदेत ही
माहिती दिली.
यापूर्वी देशभरात सिलिंडर बुकिंगसाठी 21 दिवसांचा कालावधी निश्चित होता, जो अलीकडे 25 दिवसांपर्यंत वाढवण्यात आला होता. आता ग्रामीण आणि शहरी, या दोन्ही भागांसाठी वेगवेगळी कालमर्यादा ठरवण्यात आली आहे. नवीन व्यवस्थेनुसार ग्रामीण भागातील ग्राहकांना 45 दिवसांनंतर दुसर्या सिलिंडरची बुकिंग करता येणार आहे, तर शहरी भागात 25 दिवसांचा कालावधी ठेवण्यात आला आहे. सरकारच्या मते, या निर्णयामुळे गॅस पुरवठ्यावर अचानक पडणारा दबाव कमी होण्यास मदत होईल.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायुमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी संसदेत सांगितले की, देशात पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीचा कोणताही तुटवडा नाही. ब्लॅक मार्केटिंग रोखण्यासाठी सरकारने काही महत्त्वाचे उपाय केले आहेत. लोकसभेत बोलताना हरदीपसिंह पुरी म्हणाले की, जगात सध्या ऊर्जा क्षेत्रात मोठा तणाव निर्माण झाला असला, तरी भारताची कच्च्या तेलाची पुरवठा स्थिती सुरक्षित आहे. भारत अनेक देशांकडून कच्चे तेल खरेदी करत आहे.
ग्राहकांच्या सकाळपासून रांगा
युद्धजन्य परिस्थितीनंतर अनेक गॅस एजन्सींवर ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. मुंबई, पुणे, नाशिकसह महाराष्ट्रातील शहरांत आणि ग्रामीण भागात मोठी गर्दी बघायला मिळत आहे. वाशिममध्ये सर्व्हर डाउन असल्यामुळे गॅस नोंदणी होत नाही, त्यामुळे सकाळपासून गॅस एजन्सीबाहेर नागरिक रांगेत
उभे आहेत.
अफवांमुळे वाढली होती घाईघाईची बुकिंग
गॅसटंचाईच्या अफवांमुळे अनेक ग्राहक गरजेपेक्षा आधीच सिलिंडर बुक करू लागले होते. जे ग्राहक आधी सुमारे 55 दिवसांनी सिलिंडर बुक करत होते, ते आता फक्त 15 दिवसांच्या अंतराने बुकिंग करू लागले होते. यामुळे साठेबाजी आणि काळाबाजाराची शक्यता वाढली होती. याच पार्श्वभूमीवर बुकिंगमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
gas-cylinder-booking-period-extended
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…