नाशिक

जिल्ह्यात गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत

सीमा अहिरे : अफवांवर विश्वास ठेवू नये

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात घरगुती वापरासाठी एलपीजी सिलिंडरचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. नागरिकांनी सोशल मीडियावर पसरवल्या जाणार्‍या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा अहिरे यांनी केले आहे. काही दिवसांपासून गॅस सिलिंडर मिळत नाहीत किंवा बुकिंग केल्यानंतर 25 दिवसांनीच सिलिंडर मिळतो, अशा प्रकारच्या अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
यासंदर्भात स्पष्टीकरण देताना सीमा अहिरे यांनी सांगितले की, पूर्वी गॅस बुकिंग नोंदणीची मुदत 21 दिवसांची होती. मात्र, सध्या ती 25 दिवसांपर्यंत वाढविण्यात आली आहे.
या कालावधीनंतर ग्राहकांना ओटीपी प्राप्त होतो आणि ओटीपी मिळाल्यानंतर साधारण दोन ते तीन दिवसांत गॅस सिलिंडर वितरित केला जातो. त्यामुळे नागरिकांनी गॅस एजन्सीकडे अनावश्यक गर्दी करू नये किंवा घाईगडबड करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
यासोबतच ज्या ग्राहकांनी अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेले नाही, त्यांनी ते तातडीने पूर्ण करून घ्यावे. केवायसी पूर्ण केल्यास गॅस सिलिंडर मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, गॅस सिलिंडरच्या काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विशेष पथके स्थापण्यात आली आहेत. या पथकांकडून गॅस एजन्सी तसेच हॉटेल्सची नियमित तपासणी सुरू आहे. आतापर्यंत 12 गॅस एजन्सी व 21 हॉटेल्सची तपासणी करण्यात आली. त्यात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार आढळलेला नाही.

सध्या गॅस सिलिंडर जादा दराने विक्री होत असल्याबाबतही कोणतीही ठोस तक्रार प्रशासनाकडे प्राप्त झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता काही शंका किंवा तक्रार असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा.
– सीमा अहिरे, जिल्हा पुरवठा अधिकारी

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

9 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

9 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

10 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

10 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

10 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

10 hours ago