भुजबळ : परिस्थिती सुधारण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी लागणार?
मुंबई :
नागरिकांना एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राज्य शासनाकडून सर्व संबंधित यंत्रणांना सूचित करण्यात आले आहे. तसेच यासंदर्भात राज्यस्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून, व्हॉट्सअॅप क्रमांक 9769919221 जारी करण्यात आला आहे. रिफायनरींमधील एलपीजी उत्पादन वाढवण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांना 100 टक्के गॅसपुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी येथे दिली.
विधान परिषदेत चर्चेवर उत्तर देताना मंत्री भुजबळ यांनी सभागृहात राज्यातील एलपीजी पुरवठ्याच्या अनुषंगाने राज्य शासनामार्फत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. तसेच गॅस साठेबाजीप्रकरणी 23 गुन्हे दाखल करून 18 जणांना अटक केली आहे. व्यावसायिक गॅस वाटपाच्या सूचना दिल्या असून, अत्यावश्यक सेवा पुरवणार्यांना गॅस वाटप केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री भुजबळ यांनी सांगितले की, रिफायनरी पूर्णक्षमतेने कार्यरत असून, एलपीजी आणि पीएनजीचे उत्पादन सुरू आहे. इंधन उपलब्धतेबाबत योग्य ती माहिती दिली जात आहे. काळाबाजार रोखण्यासाठी कारवाई सुरू असून, नागरिकांमध्ये घबराट पसरू नये म्हणून दररोज रेडिओ, एफएम, दूरदर्शन आणि मुद्रित माध्यमांद्वारे माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोशल मीडियावर पसरवल्या जाणार्या खोट्या बातम्यांविरोधातही जनजागृती केली जात आहे. रिफायनरीतील एलपीजी उत्पादन 9,000 मेट्रिक टनांवरून 11,000 मेट्रिक टनांपर्यंत वाढविले आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. हे दर केंद्र शासन ठरवते आणि त्यांनी सुमारे 60 रुपयांची वाढ केली आहे.
आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे काही जहाजे अडवली गेली होती. मात्र, काही जहाजे सोडण्यात आली असून, ती मुंबई, कांडला आणि कोची येथे पोहोचली आहेत. भारत सरकार रशिया, इराण आदी देशांकडून इंधन पुरवठा वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. आखाती देशांतील हल्ल्यांमुळे काही प्रमाणात पुरवठा खंडित झाला आहे, त्यामुळे जागतिक स्तरावर तात्पुरती कमतरता जाणवू शकते. तथापि, परिस्थिती लवकरच सुधारेल, अशी अपेक्षा आहे. जहाजे आल्यानंतर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 8 ते 10 दिवसांचा कालावधी लागू शकतो. तोपर्यंत घरगुती गॅस, रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांना प्राधान्याने पुरवठा केला जात आहे. आवश्यकतेनुसार केरोसिन आणि इतर पर्यायही उपलब्ध करून दिले जात आहेत.
Gas will be supplied to essential institutions.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…