घराला लागली आग, जीवितहानी टळली
दिंडोरी : वार्ताहर
तालुक्यातील पळसविहिर (पिंपळपाडा) येथे गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या.यात घराचे मोठे नुकसान झाले. तहसीलदार पंकज पवार यांनी पाहणी करुन पंचनामा केला. तालुक्यातील पश्चिम भागातील पळसवीर येथील रहिवासी कमळाकर विष्णू जाधव यांच्या घरात सिलिंडरच्या टाकीचा स्फोट होऊन घराला आग लागली. ग्रामस्थांनी आग विझवली. सुदैवाने घरातील व्यक्ती कामासाठी शेतात गेली होती. मुले शाळेत गेली होती. घरात कुणीही नसल्याने, सुदैवाने जिवितहानी टळली आहे.मात्र या स्फोटात अन्न धान्यासह संसारोपयोगी वस्तू, कागदपत्रे, दागिने व सागवानी लाकूड, मंडपाचे साहित्य ,पाईप पूर्णत: जळून खाक झाले आगीत घर पूर्णत: जळाले. लाखो रूपयांचे नुकसान झाले. या घटनेची दखल घेत तहसीलदार पंकज पवार यांनी पाहणी केली असून, तलाठी समाधान केंग व ग्रामसेवक जे.वाय. पिंगळे यांनी पंचनामा केला आहे.