नाशिकरोड : प्रतिनिधी
घंटागाडीमध्ये नजरचुकीने कचर्यासोबत गेलेली रोख रक्कम कामगारांनी परत करत प्रामाणिकपणाचे सर्वांसमोर उदाहरण घालून दिले आहे. दरम्यान, घंटागाडीवरील चालक गणेश साळुंखे, कामगार उमेश कोळी, पितांबर अलकारी यांचे सर्वत्र कौतुक होते आहे. नेहमीप्रमाणे जेलरोड परिसरातील घराघरातील कचरा उचलण्यासाठी घंटागाडी गेली. पिंपळपट्टी रोड येथील महिला रंजना भालेराव या घराची आवरासावर करीत असताना पाच हजार रुपये कचर्याच्या डब्यात पडले. मात्र, हे त्यावेळी त्यांच्या लक्षात आले नाही. काही वेळाने भालेराव यांच्या लक्षात गोष्ट आली आणि कचर्यासोबत आपली रोख रक्कम गेल्याचे कळले. यानंतर त्यांनी तात्काळ तनिष्क एंटरप्राइजचे सुपरवायझर ओम बोबडे, राहुल मोरे यांना याबाबतची माहिती दिली. यानंतर संबंधितांनी या भागातील घंटागाडीवर कोण कर्मचारी आहे, याची माहिती घेतली. तेव्हा समजले की गाडी (क्र. एमएचप 15 एफएफक्यू 0362) या गाडीवर चालक गणेश साळुंखे असून, त्यांच्यासमवेत कामगार उमेश कोळी, पितांबर अलकारी यांच्याशी संपर्क साधला. कामगारांनी गाडीतील कचरा वेगळा केला. त्यात त्यांना पाच हजारांची रक्कम मिळून आली. सदरची रक्कम रंजना भालेराव यांना कामगारांनी परत केली. दरम्यान, या प्रामाणिकपणाचे परिसरातील नागरिक, महिला यांनी कामगारांचे कौतुक करीत आभार व्यक्त केले.
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…
नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…
अॅपचा वापर करण्याचे पंतप्रधानांकडून आवाहन नाशिक : प्रतिनिधी नागरिकांना नैसर्गिक आपत्तीसह ऊन व पावसाची माहिती…
पिंपळगावच्या व्यापार्याविरोधात गुन्हा दाखल चांदवड : वार्ताहर तालुक्यातील वडनेरभैरव येथील द्राक्ष उत्पादक शेतकर्याची तब्बल 15…