घरमालकांनो सावधान, भाडेकरूंवर लक्ष आहे ना?

नाशिक ः देवयानी सोनार

शहरी भागात अनेकदा भाडेतत्त्वावर घरे दिली जातात. घरमालकाला भाडे स्वरूपात उत्पन्न मिळते. भाडेकरूला निवारा, परंतु घर ज्या व्यक्तीला भाड्याने देणार आहे अशा व्यक्तीची सखोल माहिती, त्याचा पूर्वेतिहास याचा विचार घरमालक करतो का? जेव्हा भाडेकरूंकडून गुन्हे घडतात. अनैतिक गोष्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून कळते तेव्हा घरमालकाचे धाबे दणाणते. नाशिकमध्ये यापूर्वी एका भाडेतत्त्वावर घेतलेल्या घरात दहशतवादी आढळून आला होता तर अलीकडेच भाडेतत्त्वावर घेतलेल्या जागेत आधाराश्रम थाटून तेथे मुलींसोबत अनैतिक प्रकार घडल्याचे पोलीस तपासात उघड झाल्याने घर भाडे देताना काळजी घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
शहरात अनेक गुन्हे उघडकीस आल्याने घरमालक आणि भाडेकरूंचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रकरण उघडकीस आल्यावर घरमालकांवर गुन्हे दाखल होऊ शकतात. त्यामुळे घरमालकांनी भाडेकरूची नोंदणी पोलीस स्टेशनमध्ये करणे आवश्यक आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी पोलिसांना माहिती न दिल्यास घरमालक तसेच भाडेकरू दोहोंवरही कारवाई केली जाईल. घरमालकांनी पोलीस स्टेशनला भाडेकरूंची माहिती द्यावी, असे आवाहन केले होते. मात्र, याची अंमलबजावणी झाली की नाही? याबाबत संभ्रम आहे. पोलीस ठाण्याकडूनही याबाबत समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. शहरात उद्योग-व्यवसाय आणि शिक्षणाच्या संधीमुळे अनेकदा गावाकडील, परराज्यातील नागरिक शिक्षण, उद्योग-व्यवसाय, नोकरीनिमित्त येतात. राहण्याची सोय म्हणून कामाच्या, शिक्षणाच्या ठिकाणी जवळपासच्या परिसरास पसंती दिली जाते. उत्पन्न, खर्चाचा ताळमेळ बसवत कमीअधिक भाडे देऊन वास्तव्य केले जाते. भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणे घरमालकांना कटकटीचे आणि वेळखाऊ काम वाटते.त्यामुळे कुणी या फंदात पडत नाही.
एजंटगिरी वाढली
घर भाड्याने देताना खरेतर सर्व कागदपत्रे तपासूनच दिली गेली पाहिजे. कारण यापूर्वीही अनेक गुन्हे घडल्याचे उघड झाले आहे. घर मिळवून देण्यासाठी हल्ली एजंटची मदत घेतली जाते. त्यासाठी महिनाभराचे भाडे एजंट स्वत: घेतो. नाशिक शहराचा विस्तार वाढला. नोकरी -व्यवसायानिमित्त अनेकजण नाशिकला पसंती देऊ लागले. त्यातून घर भाड्याने मिळवून देणारे एजंट निर्माण झाले.
पोलिसांकडे करावी नोंद
प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये भाडेकरूकडून भरून घ्यावयाचे अर्ज असतात. अर्जात घरमालक व भाडेकरू यांची माहिती भरावी. अर्जावर दोघांचे फोटो लावावेत. घरमालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये झालेल्या कराराच्या प्रतीची साक्षांकित झेरॉक्स तसेच ओळखपत्र या अर्जासमवेत जोडणे अनिवार्य आहे. हा अर्ज प्राप्त झाल्यानंतर पोलीस तशी नोंद करवून घेतात.
घरमालकांची उदासीनता
अनेकदा घरमालकंाना घरपट्टी वाढीव येईल या भीतीने भाडेकरूची माहिती लपविली जाते. कायदेशीर प्रक्रिया करणे अनेकदा ओळखीतला किंवा तिर्‍हाईताच्या ओळखीचा असल्याने टाळले जाते.
कराराची केवळ नोटरी : भाडेकरू आणि घरमालक यांच्यात लेखी करार केल्यानंतर त्याची नोंदणी उपनिबंधकांकडे करणे गरजेचे असते. मात्र, सध्या फक्त स्टॅम्पपेपरवर लिखापढी केली जाऊन त्याची नोटरी केली जाते.

 

कोणताही भाडेकरारनामा त्याची नोंदणी अधिनियमाचे कलम 17 नुसार नोंदणी करणे सक्तीचे आहे. नागरिकांच्या सोयीसाठी नोंदणी विभागाने शासनाच्या वतीने ऑनलाइन लिव्ह लायसन्स सुविधा उपलब्ध करून दिली आहे.जागामालक आणि भाडेकरू यांना प्रत्यक्ष कार्यालयात न येता कोणत्याही विलंबाशिवाय ऑनलाइन घरून किंवा कार्यालयातून दस्तनोंदणीची सोय झालेली आहे. जर भाडेकरार नोंदणी केल्यास घरमालकाचे हितसंबंध सुरक्षित राहतात. कायदेशीर गुंतागुंत निर्माण झाल्यास लिव्ह लायसन्स हा उत्तम पुरावा कायद्याने गृहीत धरला जातो. म्हणून लिव्ह लायसन्स किंवा भाडेपट्टा दस्त नोंदणीचे आवाहन नोंदणी विभागामार्फत करण्यात येत आहे. भाडेकरार लपवणे खासगीत करणे असे प्रकार आढळल्यास कारवाई करण्यात येईल.
– के. आर. दवंगे (मुद्रांक जिल्हाधिकारी)

घरमालकाने, भाडेकरूने उपनिबंधकांकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. ऑन आणि ऑफलाइन पद्धतीने फ्लॅट, घर भाड्याने देताना भाडेकरूचे कागदपत्र रजिस्टर केले जाऊ शकते. हे केल्यावर घरमालकाला पोलिस स्टेशनलाही कळविणे बंधनकारक आहे. अनेकदा करारनामे हे नोटरी करतात. जेव्हा एखादा भाडेकरी घर खाली करीत नाही त्यावेळी घरमालक आणि भाडेकरूसंदर्भात केस दाखल केली जाते. तेव्हा स्टॅम्पचा दंड भरावा लागतो. त्यामुळे कुठलेही दस्त कोणालाही घर भाड्याने देताना निबंधक उपनिबंधक कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक आहे. ऑनलाइन प्रणाली सुरू झाली आहे. घर रजिस्टर करणे आणि त्यांची नोंद स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये देणे गरजेचे आहे. अन्यथा घरमालकांवर गुन्हे दाखल होऊ शकतो.
– ऍड. दीपक पाटोदकर

Bhagwat Udavant

Recent Posts

गंगापूर व दारणा धरणातून विसर्ग

गंगापूर व दारणा धरणातून विसर्ग वाढणार नागरिकांना सतर्कतेचे आवाहन   नाशिक : प्रतिनिधी शहर आणि…

5 hours ago

जिल्हा परिषद गट-गण रचनेचे प्रारूप सादर

चांदवड, सुरगाणा, मालेगाव तालुक्यात प्रत्येकी एका गटाने वाढ, संख्या 74 वर नाशिक : प्रतिनिधी जिल्हा…

22 hours ago

मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार झाले ‘पोषणदूत’

कुपोषित बालकांच्या आरोग्य संवर्धनासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम नाशिक : प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या पोषणदूत उपक्रमांतर्गत अंतर्गत…

22 hours ago

प्रस्तावित रामवाडीतील पुलाला साइड ट्रॅक; निविदेतून वगळले

उर्वरित सव्वाशे कोटींच्या कामांना मात्र हिरवा कंदील नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने…

22 hours ago

लाखलगाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

रात्रीच्या वेळी घरांच्या कड्या वाजवून दहशत माडसांगवी : वार्ताहर लाखलगावसह परिसरात चोरांच्या दहशतीमुळे लाखलगावचे ग्रामस्थ…

22 hours ago

लिव्ह इन रिलेशनशिप विवाहसंस्थेला पर्याय ठरू शकत नाही

लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…

22 hours ago