कसारा घाटात क्रूझर उलटून बालिका ठार, 7 जखमी

इगतपुरी : प्रतिनिधी
नाशिक-मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात बुधवारी धबधबा पॉईंटच्या पुढील वळणावर क्रूझर उलटून झालेल्या अपघातात बालिका ठार झाली. तर सात जण जखमी झाले.
कसारा घाटाच्या वळणावर  क्रूझर एम.एच 22- यू 2801 वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने क्रूझर रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक भिंतीवर  आदळून झालेल्या अपघातात दर्शना विजय कांबळे (11, रा.मंठा जि.जालना ) ही बालिका ठार झाली तर  लिलाबाई लिंबाजी राठोड (30, वर्ष रा. मालेगाव), लिंबाजी राठोड (40, रा .मालेगाव) विठ्ठल चव्हाण (45 रा. वसई), जयश्री गजानन पवार (34  रा. वसई),अनवी गजानन पवार(1 वर्ष रा.वसई), कल्पना राजेश जाधव (30, रा. वसई) शामराव चव्हाण (60,रा. वसई)  हे सर्वजण किरकोळ जखमी झाले आहेत. सदर मयतास व  जखमीस टोलनाका ऍम्बुलन्सने कसारा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविले अपघातग्रस्त वाहन रस्त्याचे बाजूला केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *