नाशिक

जिल्ह्यात दहावीत मुलींचीच बाजी

येवला तालुक्यात एन्झोकेमच्या पहिल्या पाचमध्ये विद्यार्थिनीच

नाशिक ः प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 2024-25 दहावी परीक्षेचा निकाल ऑनलाइन मंगळवारी जाहीर झाला. शहरासह जिल्ह्यात दहावी परीक्षेत मुलींनीच बाजी मारली. जिल्ह्यातील बहुतांश विद्यालयांमध्ये पहिला पाच गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त मुलींचा समावेश आहे.

येवल्यात यशश्री वाकचौरे अव्वल

येवला येथील सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन्झोकेम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एस.एस.सी. परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला. यशश्री वाकचौरे हिने 98 टक्के गुण मिळवून येवला तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. तालुक्यात पहिल्या चार विद्यार्थिनी एन्झोकेम विद्यालयाच्या आहेत. विद्यालयात प्रथम यशश्री वाकचौरे (98 टक्के), द्वितीय स्वरा मोरे (97.80), तृतीय तितीक्षा बिन्नर(97.60), चतुर्थ सृंजल देसले (96.40), पाचवा क्रमांक समीक्षा महादार, दीपिका सोनवणे, निराली पटणी व साईश्रुती यादव (प्रत्येकी 93.40 टक्के) यांनी मिळविला. संस्थेच्या येवला तालुक्यातील धामणगाव येथील विद्यालयाचा निकाल 96 टक्के लागला. ऋषिकेश जाधव 85.80 टक्के, यश चव्हाण 83.20 टक्के, वैष्णवी गवळी 80.60 टक्के गुण मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. न्यू इंग्लिश स्कूल, उंदीरवाडी विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला. त्यात सृष्टी क्षीरसागर 92.20 टक्के, समृद्धी काळे 91 टक्के व कावेरी क्षीरसागर 90.20 टक्के गुण मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष पंकज पारख, उपाध्यक्ष डॉ. मनीष गुजराथी, सरचिटणीस सुशील गुजराथी, कोषाध्यक्ष अशोक शाह, प्रशासनाधिकारी दत्ता महाले, संस्थाचालक, प्राचार्य दत्तकुमार उटवाळे, उपप्राचार्य कैलास धनवटे, पर्यवेक्षक अनिल शेलार, उच्च माध्यमिक विभागप्रमुख कैलास पाटील, बाळासाहेब वाबळे, सुभाष नागरे आदींनी अभिनंदन केले.

Gavkari Admin

Recent Posts

इगतपुरी नगरपरिषदेचे तीन कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात

एक लाख सत्तर हजारांच्या लाचेची मागणी इगतपुरी नगरपरिषदेचे तीन कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात नाशिक: प्रतिनिधी सीसीटीव्ही…

10 hours ago

सिन्नर तालुक्यात वीज पडून एक गाय, दोन शेळ्या ठार

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यात सोमवारी (दि.12) दुपारनंतर तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी वार्यासह विजांच्या कडकडाटांसह अवकाळी…

10 hours ago

शहरात भोंगे वाजले, पण कोणी ऐकलेच नाही

नाशिक : प्रतिनिधी भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीत शस्त्रसंधी झाली असली, तरी संरक्षण विभागातर्फे संरक्षणाची सर्व प्रक्रिया…

10 hours ago

प्रक्रिया करूनच सांडपाणी नदीत सोडावे

अतिरिक्त आयुक्त नायर : गोदावरी उपसमितीच्या बैठकीत सूचना नाशिक : प्रतिनिधी गोदावरी व तिच्या उपनद्या…

11 hours ago

महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृती जगभरात पोहोचण्याची गरज : विष्णू मनोहर

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्राला जशी सांस्कृतिक परंपरा आहे तसेच महाराष्ट्राची खाद्यसंस्कृतीदेखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, ती…

11 hours ago

विहिरीत पडलेल्या बछड्याला सुखरूप बाहेर काढले

चांदवड : वार्ताहर तालुक्यातील पारेगाव येथे एका 60 फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला वनविभाग…

11 hours ago