गिरणा गौरव पुरस्कार जाहीर

डॉ. रवींद्र कोल्हे,हडवळ,इनामदार, पाटील कुमावत,ठाकरे यांचा समावेश

नाशिक – गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त देण्यात येणारा २५ वा गिरणा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, यंदाच्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे.,चित्रपट दिग्दर्शक मंगेश हडवळ, पिंपरी चिंचवडचेमहानगरपालिकेचे आयुक्त, राजेश पाटील, संगीत दिग्दर्शक कौशल इनामदार, यांच्यासह अकरा जणांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
कालिदास कला मंदिरात येत्या पाच एप्रिल रोजी मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती गिरणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी दिली .निवड समितीच्या बैठकीत या पुरस्काराच्या नावाची घोषणा करण्यात आली. मानपत्र ,स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे पुरस्काराचे हे 25 वे वर्ष असून यात प्रामुख्याने सामाजिक, साहित्य ,शैक्षणिक सहकार, कला, संगीत, आदी क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील नामवंतांना हा उतर महाराष्ट्राचा मानाचा स्तंभ म्हणून ओळखला जाणारा पुरस्कार देऊन गौरविण्यात येतो. यंदा या पुरस्कारासाठी ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर रवींद्र कोल्हे (अमरावती) यांच्या सामाजिक योगदानाबद्दल विशेष सन्मान करण्यात येणार आहे.तर चित्रपट दिग्दर्शक मंगेश हाडवळ (पुणे) संगीतकार कौशल इनामदार (मुंबई ) राजेश पाटील आयुक्त पिंपरी चिंचवड मनपा (पुणे) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागाचे नाशिक अध्यक्ष व मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे (नाशिक), अहिराणी भाषा समृद्ध करणारे गायक व गितकार सचिन कुमावत (जळगाव) साने गुरुजी एज्युकेशन संस्थेचे प्रवीण जोशी (नाशिक)नाशिक कवी चे अध्यक्ष व साहित्यक इंजि. बाळासाहेब मगर(नाशिक) शिवाजी दहिते पाटील (धुळे) ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे ( दिंडोरी), महिलांसाठी योगदान देणाऱ्या स्वाती भामरे ( नाशिक) शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणारे प्राचार्य डॉक्टर सुभाष भालेराव( येवला ) आशिया खंडातील व भारतातील पहिल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महिला चेअरमन सुवर्णा जगताप (लासलगाव) यांचा पुरस्कारामध्ये समावेश आहे.
प्रकाश होळकर, दिलीप पाटील, राजेंद्र निकम ,शंकर बोराडे, रवींद्र मालूंजकर, शिवाजी जाधव,प्रल्हाद ठाकरे, संजय फतनानी या समितीने पुरस्कार्थीची निवड केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *