महाराष्ट्र

कर कमी करून वाहतूकदारांना दिलासा द्या- राजेंद्र फड

कर कमी करून वाहतूकदारांना दिलासा द्या- राजेंद्र फड
नाशिक :प्रतिनिधी  डीझेलवरील कर कमी करण्यात यावे याबाबत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने वारंवार केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात आलेला आहे. याबाबत केंद्र शासनाने डीझेलवरील कर कमी करत काही अंशी दिलासा दिला आहे. मात्र अद्यापही राज्यशासनाच्या वतीने डीझेलवरील कर समाधानकारक पद्धतीने कमी करण्यात आलेला नाही. त्यामुळे डीझेलवरील कर कमी करून राज्यातील वाहतूकदारांना दिलासा द्यावा अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
याबाबत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, डीझेलच्या दरात दिवसेंदिवस होत असलेल्या वाढीमुळे महागाईचा फटका वाहतूकदारांसोबत राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना देखील बसत आहे. विशेष म्हणजे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात असलेली डिझेलची किंमत अधिक असल्याने महाराष्ट्रातील वाहतूकदारांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. डीझेलचे दर अधिक असल्याने त्याचा परिणाम भाडेवाढीवर होतो आहे. वाहतूक खर्चात अधिक वाढ होत असल्याने परिणामी महागाई अधिक वाढत आहे. याचा फटका ट्रान्सपोर्ट व्यवसायाला अधिक बसत आहे. एकीकडे अनेक अडचणींचा सामना करत असलेला ट्रान्सपोर्ट व्यवसाय डीझेलच्या दरवाढीमुळे त्रस्त झाला असून त्यांना दिलासा मिळणे आवश्यक आहे.
त्यात पुढे म्हटले आहे की, सर्वसामान्य नागरिक तसेच वाहतूकदारांना दिलासा देण्यासाठी नुकतेच केंद्र सरकारच्या वतीने पेट्रोल व डीझेल वरील कर कमी करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूकदारांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. मात्र अद्यापही इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र सरकारकडून घेतला जाणारा पेट्रोल डीझेल वरील कर हा अधिक असल्याने वाहतूकदार अडचणीत आले  आहे. त्यामुळे वाहतूकदारांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने डीझेल वरील कर कमी करण्याची आवश्यकता आहे. राज्यात नुकतेच आपल्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले असून डीझेलवरील कर कमी करून वाहतूकदारांना दिलासा द्यावा अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या करण्यात आलेली आहे.
Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

8 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

8 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

8 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

8 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

8 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

8 hours ago