मुंबई : प्रतिनिधी मुंबईच्या झवेरी बाजारातील मेसर्स चामुंडा बुलीयन या कंपनीची उलाढाल वर्ष २०१९ -२० मध्ये २२.८३ कोटी रुपयांवरून वर्ष २०२०- २१ मध्ये ६५२ कोटी आणि वर्ष २०२१-२२ मध्ये १७६४ कोटी रुपयांपर्यंत संशयास्पद वाढल्याचे राज्य जीएसटी विभागाच्या विश्लेषणात लक्षात आल्यानंतर जीएसटी विभागाने छाप्यात कंपनीच्या अनेक शाखांची नोंदणी आढळून आली नाही . कंपनीच्या ३५ चौरस मीटरच्या एका छोट्या जागेत जीएसटी विभागाला भिंतीत लपवून ठेवलेली ९ कोटी ७८ लाखांची रोकड आणि १३ लाख रुपये किमतीच्या १ ९ लाख किलो चांदीच्या विटा आढळून आल्या . राज्य जीएसटी विभागाने सदर जागा सीलबंद केली असून , प्राप्तिकर विभागालाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे .
प्राप्तिकर विभागाने सदर रक्कम आणि मालमत्तेचा स्त्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे . राज्य जीएसटी विभागाने गेल्या काही महिन्यापासून जीएसटी चोरी शोधणे आणि कारवाईची मोहिम तीव्र केली असून , हजारो कोटींची जीएसटी चोरी शोधण्यात यश मिळविले आहे . राज्य करविभागाचे सहआयुक्त राहुल द्विवेदी , उपायुक्त विनोद देसाई यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे . जीएसटी चोरीविरुद्धची कारवाई या पुढच्या काळात अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे राज्य कर विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे .
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…