अहो आश्चर्यम ! भिंतीत १० कोटींची रोकड , १९ किलो चांदीच्या विटा कुठे घडली घटना ?

 

मुंबई : प्रतिनिधी   मुंबईच्या झवेरी बाजारातील मेसर्स चामुंडा बुलीयन या कंपनीची उलाढाल वर्ष २०१९ -२० मध्ये २२.८३ कोटी रुपयांवरून वर्ष २०२०- २१ मध्ये ६५२ कोटी आणि वर्ष २०२१-२२ मध्ये १७६४ कोटी रुपयांपर्यंत संशयास्पद वाढल्याचे राज्य जीएसटी विभागाच्या विश्लेषणात लक्षात आल्यानंतर जीएसटी विभागाने छाप्यात कंपनीच्या अनेक शाखांची नोंदणी आढळून आली नाही . कंपनीच्या ३५ चौरस मीटरच्या एका छोट्या जागेत जीएसटी विभागाला भिंतीत लपवून ठेवलेली ९ कोटी ७८ लाखांची रोकड आणि १३ लाख रुपये किमतीच्या १ ९ लाख किलो चांदीच्या विटा आढळून आल्या . राज्य जीएसटी विभागाने सदर जागा सीलबंद केली असून , प्राप्तिकर विभागालाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे .

प्राप्तिकर विभागाने सदर रक्कम आणि मालमत्तेचा स्त्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे . राज्य जीएसटी विभागाने गेल्या काही महिन्यापासून जीएसटी चोरी शोधणे आणि कारवाईची मोहिम तीव्र केली असून , हजारो कोटींची जीएसटी चोरी शोधण्यात यश मिळविले आहे . राज्य करविभागाचे सहआयुक्त राहुल द्विवेदी , उपायुक्त विनोद देसाई यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे . जीएसटी चोरीविरुद्धची कारवाई या पुढच्या काळात अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे राज्य कर विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *