सुनार का कचरा बादामसे महंगा!

कचर्‍यातून मिळणार्‍या सोन्यावर झारेकर्‍यांची गुजराण

 

नाशिक ः देवयानी सोनार

 

शहरातील सराङ्ग बाजार,स्मशानभूमी,गोदाघाट,अस्थिविसर्जन,नदीकाठ आदी ठिकाणी मिळणारे सोने, पैसे,नाणी शोधून त्यावर गुजराण करणार्‍या झारेकरी समाज अजूनही हलाखीचे जीवन जगत असल्याचे चित्र आहे.कचर्‍यातून अनुभव आणि कौशल्यातून सोने काढले जाते. सोने शोधण्यात झारेकरी समाज तरबेज आहे.

 

 

 

झारेकरी समाजाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. मात्र, काळानुरुप या समाजाची फारशी प्रगती झाली नाही. शिक्षणाचा अभाव आणि शासकीय योजनांची माहिती नसल्याने समाजाच्या नशिबी उपेक्षितांचे जीणं आले आहे.

 

 

सुनार का कचरा बादामसे महंगा असे म्हटले जाते. त्यामुळे या कचर्‍यातून सोने शोधून झारेकरी समाज गुजराण करीत असतो. झारेकरी समाजाच्या पहिल्या पिढीकडे जिल्हाधिकार्‍यांनी दिलेले ओळखपत्र आहे. सद्या मात्र, असे कोणत्याच प्रकारचे ओळखपत्र दिले जात नाही.अशी खंत झारेकरी चंदू गावडे यांनी व्यक्त केली.

 

झारेकरी हे मुळतः ओडीशा पं.बंगाल येथील आहेत. पिढीजात हाच व्यवसाय असल्याने अनुभवातून कौशल्याने सोने नाणे काढण्याचे काम केले जाते. अनुसूचित जाती जमातीमध्ये हा समाज मोडतो. 100 ते 150 वर्षापूर्वीची झारेकर्‍यांची पहिली पिढी नाशिकमध्ये वास्तव्यास आहे. संपूर्ण भारतभर समाज पसरलेला आहे.नाशिकमध्ये मखमलाबाद परिसरात 15 ते 20 कुटुंब आहे. सर्व मिळून जवळपास 70 ते 100 जण परिवारात असून कुटुंबातील प्रत्येकजण याच व्यवसायात आहे.

 

 

 

 

शिक्षणाचा अभाव असल्याने मिळणार्‍या सवलती,लाभ यापासून अनभिज्ञ असल्याने परिस्थिती बदललेली नाही.आताची पाचवी,सहावी पिढी सराङ्ग बाजारातील कचर्‍यातून सोने शोधण्याचे काम करतात.काही नदीतील मिळालेले पैसे,सोने मिळवतात. स्मशानातील सोने पैसे शोधण्याचे काम करतात.अनेकदा नदीतील सोने पैसे काढण्यासाठी एका गावातून दुसर्‍या गावात शोध घेण्यासाठी जावे लागते परंतु स्थानिकांना झारेकरींचा परिचय नसल्याने चोर किंवा उपद्रव करणारे समजून हाकलून दिले जाते.त्यामुळे ओळखपत्र मिळावे अशी अपेक्षा आहे. सराङ्ग बाजारातून सोनाराकडून दुकानामधील कचरा पाचशे हजार रुपयांना विकत घेतला जातो.दुकानाबाहेरील कचरा झारेकरी महिला झाडू मारून कचरा गोळा करून त्यातून सोने काढले जाते.

 

 

 

 

 

नेर्‍यातून असे मिळवतात सोने

सराफी दुकानातील आणि बाहेरील कचरा गोळा केला जातो. बारीक ब्रशने सर्व परिसर झाडला जातो. झारेकरी मिळालेला कचरा पाण्यात टाकून धुतात. मातीत घोळून घोळून दगड,माती रोळली जाते. सोन्याचे,चांदीचे कण गोळी स्वरूपात शिल्लक राहतात.हे जमा झालेले कण एकत्रीत करून पुन्हा सोनाराकडे विकतात.दररोज 150 ते 200 मिली सोने सापडले जाते.दिवाळीत 500 मिली ते 1 ग्रॅमपर्यंत सोने सापडते.दररोज तीनशे ते पाचशे रुपये झारेकरी महिलांना मिळतात. शहरातील गोदाघाट वा इतर नदीकिनारी वाळूतून सोने,सुटे पैसे,नाणी काढले जातात. स्मशानभूमीत मृतकांच्या अंगावरील सोने,पैसे काढण्याचे काम केले जाते.

 

 

 

नेर्‍यातून असे मिळवतात सोने

सराफी दुकानातील आणि बाहेरील कचरा गोळा केला जातो. बारीक ब्रशने सर्व परिसर झाडला जातो. झारेकरी मिळालेला कचरा पाण्यात टाकून धुतात. मातीत घोळून घोळून दगड,माती रोळली जाते. सोन्याचे,चांदीचे कण गोळी स्वरूपात शिल्लक राहतात.हे जमा झालेले कण एकत्रीत करून पुन्हा सोनाराकडे विकतात.दररोज 150 ते 200 मिली सोने सापडले जाते.दिवाळीत 500 मिली ते 1 ग्रॅमपर्यंत सोने सापडते.दररोज तीनशे ते पाचशे रुपये झारेकरी महिलांना मिळतात. शहरातील गोदाघाट वा इतर नदीकिनारी वाळूतून सोने,सुटे पैसे,नाणी काढले जातात. स्मशानभूमीत मृतकांच्या अंगावरील सोने,पैसे काढण्याचे काम केले जाते.

 

 

 

आमची पिढी अशिक्षीत असून पूर्वी आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ओळखपत्र दिले जात होते. परंतु नंतरच्या पिढीकडे कोणतेही ओळखपत्र नाही.त्यामुळे काम करतांना अडचणी येतात.मुलांची मुले शिक्षण घेत आहेत.ओळखपत्र किंवा इतर सवलती बाबत समाजाकडे माहिती नाही.मागण्या हक्कांसाठी लढण्यासाठी आर्थिक पाठबळ आणि माहिती नसल्याने अडचणी येत आहेत. न्याय हक्कासाठी प्रयत्न केले परंतु महिती नसल्याचा गैरङ्गायदा घेतला जात आहे.

चंदू गावडे, झारेकरी

 

 

 

 

 

 

प्राचीन नाण्यांना इतिहास अभ्यासामध्ये महत्वाचे साधन मानले जाते.झारेकरी जमात नदीतून किंवा इतर ठिकाणाहून नाणी काढण्याचे काम करीत असतात. इतिहासजमा झालेले संस्कृती राजघराणे राजवाडे यासाठी पूरक असतात. त्यामुळे महत्वाची कामगिरी करणार्‍या झारेकर्‍यांना योग्य तो सवलती मिळाव्यात जेणे करून जास्त काम करून ऐतिहासीक वारसा शोधण्यास मदत होईल. हा समाज अशिक्षीत असल्याने अनेक अडचणी येतात. त्यामुळे शासनदरबारी योग्य ती दखल घेण्यात यावी
झारेकर्‍यांमुळे अनेक जुन्या नाण्यांचा शोध लागला आहे. झारेकरी सराफी दुकानातील आणि बाहेरील कचरा गोळा करून त्यापासून सोने मिळवतात. यांची पिढी अजूनही पारंपरिक व्यवसायात आहे. अल्प समाज असून अशिक्षित आहे.
चेतन राजापूरकर (सराफ व्यावसायिक,इंडिया बुलियन ऍन्ड ज्वेलर्स असोसिएशन)

 

 

 

 

 

 

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्‍याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…

17 hours ago

थेटाळेजवळ वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…

19 hours ago

वृक्षतोड साधूंसाठी की संधिसाधूंसाठी?

हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…

21 hours ago

सिन्नर नगरपरिषदेसाठी सरासरी 67.65 टक्के मतदान

मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…

21 hours ago

नाशिक जिल्ह्याची ओळख आता ‘बिबट्यांची पंढरी’?

देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…

21 hours ago

रासायनिक खतांच्या दरात पुन्हा वाढ

शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…

21 hours ago