Good news: ७ हजार पदांसाठी पोलीस भरती होणार

मुंबई : राज्यातील युवकांसाठी मोठी बातमी आहे . राज्यात लवकरच पोलीस भरतीप्रक्रिया पार पडणार आहे . गृहविभागातर्फे ७ हजार पदांसाठी पोलीस भरतीप्रक्रिया राबविली जाणार आहे . पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी एकाचवेळी ही भरतीप्रक्रिया पार पडणार आहे , अशी माहिती सूत्रांनी दिली आहे . त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे . गृहविभागातर्फे हजार पदांसाठी पोलीस भरतीप्रक्रिया राबविली जाणार आहे . आहे . हीभरतीप्रक्रिया जून महिन्यामध्ये पार पडण्याची शक्यता आहे . लवकरच यासंबंधीची जाहिरात देखील काढली जाणार आहे . त्यादृष्टीने गृहखात्याची सगळी तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती मिळत आहे .

तसेच पहिल्या टप्प्यात ७ हजार पदांच्या भरतीप्रक्रियेनंतर राज्यात लवकरच आणखी एक मोठी भरतीप्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे . राज्यातील विविध पोलीस आयुक्त कार्यालयात आणि जिल्हा पोलीस कार्यालयांमधील २०१ ९ च्या भरती प्रक्रियेनुसार ५२०० पदांची भरती होणार होती . ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून निवड झालेले उमेदवार सेवेत रुजू होत आहेत . राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरु असताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना पोलीस भरतीसंदर्भात माहिती दिली होती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *