निमा व अभिनवच्या संयुक्त विद्यमाने अप्रेंटिस प्रशिक्षण कार्यशाळा
नाशिक:प्रतिनिधी
राज्यातील बेरोजगारी दूर करणे हे शासनाच्या कौशल्य विकास विभागाचे धोरण असून कौशल्य कार्यक्रमात सर्वानी सहभागी व्हावे,असे आवाहन कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी केले.
नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅनुफॅक्चरर्स असोसिएशन(निमा) तसेच अभिनव इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉंलॉजी अँड मॅनॅजमेन्ट यांच्या संयुक्त विद्यमाने होत्या.अप्रेंटिस प्रशिक्षण व कुशल युवा समृद्ध नाशिक या कार्यशाळेचे निमा हाऊस(सातपूर) येथे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून अनिसा तडवी बोलत होत्या. व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे,सचिव राजेंद्र अहिरे,औद्योगिक संस्था संवाद समितीचे चेअरमन श्रीधर व्यवहारे,निपमचे चेअरमन प्रकाश बारी,निमाच्या एचआर समितीचे चेअरमन भूषण पटवर्धन,हेमंत दीक्षित,अभिनव इन्स्टिट्यूटचे सुधीर दीक्षित होते.
नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्य विकासचा अंतर्भाव कारण्यात आला आहे.त्यामुळे अगदी सुरुवातीपासूनच कुशल मनुष्यबळ मिळावा हा त्यामागचा खरा उद्देश आहे.आम्ही रोजगार मेळावे घेतले मात्र नाशकात रोजगार जास्त आणि आणि त्यासाठी उपलब्ध मनुष्यबळ कमी अशी स्थिती असल्याचे जाणवले.आमच्यात काही उणिवा असल्यास त्या दूर करण्याचा प्रयत्न करू.निमाच्या काही समस्या दूर करू,असेही त्या पुढे म्हणाल्या.
नवीन तंत्रज्ञानाची सांगड घालून नाशिकच्या उद्योगांना पुरेसे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस असून त्यासाठी शासनाच्या विविध यंत्रणांमार्फत आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.नीम रुळावर येत असतांना अचानक ती गुंडाळली गेली.आता अप्रेंटिस प्रशिक्षणासाठी पुढे येणाऱ्या अभिनव सारख्या संसथांना निमाचे सदैव पाठबळ राहील,असेही बेळे यांनी निदर्शनास आणले.निमाच्या औद्योगिक संस्था संवाद समितीचे चेअरमन श्रीधर व्यवहारे म्हणाले की नाशिक हे शैक्षणिक हब आहे.येथे औद्योगिक क्षेत्रासाठी मुबलक प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची क्षमता असून तो येथेच कसा रोखून ठेवता येईल यादृष्टीने पावले उचलावीत.निपमचे चेअरमन प्रकाश बारी यांनी धनंजय बेळे यांच्या नेतृत्वाखालील निमाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या कार्याची तोंडभरून स्तुती केली.मनुष्यबळ विकासात निमाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही कार्य करू,असेही ते म्हणाले.निमाच्या एचआर समितीचे चेअरमन भूषण पटवर्धन यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेची माहिती विशद केली.
अभिनव इन्स्टिट्यूटचे अतुल खर्चे आणि विक्रम शेट्टी यांनी अँप्रेन्टीसशिप संदर्भात माहिती दिली. नुकताच बंद पडलेल्या नीम योजनेला उपलब्ध असलेल्या कमवा आणि शिका योजनेची माहिती दिली.अभिनव इन्स्टिटयूट १९९४ पासून ट्रैनिंग आणि स्किल क्षेत्रात कार्यरत आहे.अभिनव आणि महाराष्ट्र शासन यांच्यात नुकताच स्किल आणि नोकरीसंदर्भात सामंजस्य करार झाला आहे.अभिनव मुंबई , महाराष्ट्र राज्य ,गोवा राज्य , त्रिपुरा राज्य आणि संपूर्ण भारतात अँप्रेन्टीसशिप स्किल क्षेत्रात कार्यरत आहे,असेही ते पुढे म्हणाले. नंतर त्यांनी उद्योजकांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. कार्यक्रमास उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.