गोविंद बोरसे व प्रवीण अलई यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी निवड

गोविंद बोरसे व प्रविण अलई यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी निवड

नाशिक: भाजपा विभागीय प्रसिध्दी प्रमुख गोविंद बोरसे व भाजपा प्रदेश सोशल मिडीया माजी संयोजक प्रविण अलई यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी निवड झाल्याची माहिती भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावळकुळे यांनी प्रदेश कार्यालयातून प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले व त्यांच्या निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले. या निवडीबद्दल केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार, नामदार गिरीष महाजन, खा.उन्मेश पाटील, खा.सुभाष भामरे, खा.हिना गावित, प्रदेश उपाध्यक्ष जयकुमार रावल, प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आ.राम शिंदे, आ.श्रीकांत भारतीय, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश माध्य विभाग व प्रसिध्दी प्रमुख नवनाथ बन, भाजप शहर अध्यक्ष गिरीष पालवे, आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. राहुल ढिकले, नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष केदा आहेर, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, प्रदीप पेशकर, विजय साने, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगूरकर, सुनिल केदार, जगन आण्णा पाटील तसेच शहर, मंडल, उत्तर महारष्ट्रातील भाजपा आमदार, खासदार, पदाधिकारी विविध आघाड्या प्रकोष्ट, मोर्चे यांच्या पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

निवडीचे पत्र मिळाल्यानंतर गोविंद बोरसे व प्रविण अलई यांनी सांगितले की पक्षाच्या धेय धोरणांचे पालन करून पक्षाकडून आलेले विविध विषय माध्यमातून जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहचवू.

दरम्यान 2012 पासून गोविंद बोरसे यांनी शहर प्रसिध्दी प्रमुख, सोशल मिडीया प्रदेश सह संयोजक तसेच विभागीय प्रसिध्दी प्रमुख आदी पदांवर परिणामकारक रित्या काम केले. हे कार्य डोळयापुढे ठेवून भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर विश्वास टाकून भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी निवड केली. तर प्रविण अलई यांनी हि जिल्हा सोशल मिडीया संयोजक, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख, विभागीय सोशल मिडीया सह संयोजक, महाराष्ट्र प्रदेश सोशल मिडीया संयोजक आदी पदावर यशस्वी काम केले म्हणून त्यांना त्यांच्या कार्याचा अनुभव बघता प्रदेश प्रवक्ते म्हणून त्यांची निवड करण्यात आली.

Bhagwat Udavant

Recent Posts

घिबली अ‍ॅपची कमाल; मशालच्या जागी कमळ!

घिबली अ‍ॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…

1 day ago

नियोजित वधुचे अफेअर उघड, विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन

नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…

2 days ago

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

2 days ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

4 days ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

4 days ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

4 days ago