येवला तालुक्यातील जवानाचा अपघाती मृत्यू

येवला तालुक्यातील जवानाचा अपघाती मृत्यू

येवला: प्रतिनिधी

तालुक्यातील मानाेरी येथील भारतीय सैन्य दलातील जवान अजित शेळके यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या अकाली मृत्यूबद्दल येवला तालुक्यावर शाेककळा पसरली आहे जवान अजित शेळके हे राजस्थान येथे सेवेत हाेते . आपले कर्तव्य बजावुन शेळके आपल्या दुचाकीने जात असताना अपघात हाेऊन ते गंभीर जखमी झाले होते त्यांना येथिल हाॅस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले हाेते, तथापि प्रकृतीत सुधारणा हाेत नसल्याने त्यांचे  निधन झाले. या निधनामुळे येवला तालुक्यातील नागरीकांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे दरम्यान उद्या साेमवार राेजी त्यांच्या मानाेरी गांवी त्यांच्यावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असुन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शहिद जवान अजित शेळके यांच्या निधना बद्दल  दु:ख व्यक्त केले आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

16 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

16 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

16 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

16 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago