महाराष्ट्र

जीपॅट’च्या गोंधळाचा अनेकांना ‘जॅकपॉट’

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) ऑनलाइन  जीपॅट परीक्षेमध्ये देशभर गोंधळ

नाशिक ः प्रतिनिधी
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) ऑनलाइन पद्धतीने घेतलेल्या जीपॅट परीक्षेमध्ये देशभर मोठा सावळा गोंधळ पाहावयास मिळाला असल्याने या परीक्षा रद्द करुन नव्याने परीक्षा घेण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात अनेक तक्रारी शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचाकडे प्राप्त झाल्या आहेत. शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचातर्ङ्गे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचचे मिलिंद वाघ,मुकुंद दीक्षित ,वासंती दीक्षित,सचिन मालेगावकर,डॉ.मच्छिंद्र बोचरे आणि विविध ठिकाणाहून आलेले फार्मसीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
नाशिक , पुणे , औरंगाबाद , कोल्हापूर , वर्धा अशा विविध ठिकाणांहून तक्रारी आलेल्या असून मंचाने विद्यार्थ्यांच्या बाजूने लढा सुरू केला आहे. गांभीर्य लक्षात घेता ही परीक्षा रद्द करून पुन्हा नव्याने परीक्षा घेण्याची मागणी देशभरातील फार्मसी विद्यार्थी पालक शिक्षक तसेच अनेक संघटनांकडून होत आहे.
यावर्षांची परीक्षा 9 एप्रिल रोजी घेण्यात आली.मात्र, परीक्षा पद्धतीमध्ये अनेक दोष आढळून आले आहेत, असा दावा यावेळी करण्यात आला. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देताना कोणत्याच प्रकारची तपासणी केली नाही. आसनव्यवस्था परीक्षा क्रमांकानुसार नव्हती, काही मुलांची बायोमेट्रिक हजेरीही घेतली नाही. परीक्षेत सर्रासपणे मोबाइलचा मुक्तपणे वापर करण्यात आला. अनेक विद्यार्थ्यांनी गुगलचा मुक्तपणे वापर केला. याबाबत विद्यार्थ्यांनी परीक्षा घेणार्‍या एनटीएकडे मेलद्वारे तक्रारी केल्या. मात्र, दखल घेतली गेली नाही. यामुळे या परीक्षेच्या विश्वासार्हतवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे सुरुवातीपासूनच या परीक्षेच्या पद्धतीत गोंधळाचे वातावरण होते. जानेवारीमध्ये अर्ज मागवताना परीक्षेची तारीख नंतर कळविण्यात येईल असे सांगण्यात आले होते. परीक्षेच्या केवळ सात दिवस आधी परीक्षेच्या शहराची पूर्व सूचना देण्यात आली . मात्र परीक्षा केंद्राचा निश्चित पत्ता परीक्षेच्या केवळ 48 तास आधी कळवण्यात आला. अनेक विद्यार्थ्यांना वेगळे परीक्षा केंद्र असल्याचे समजल्याने त्यांची फार्मसीच्या जीपॅट परीक्षेत सावळागोंधळ
धावपळ उडाल . परीक्षेच्या दिवशी सकाळी साडेसात ते साडेआठ या दरम्यान रिपोर्टिंग असताना दिलेल्या वेळेनुसार विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले. तिथे कोणीही परीक्षा अधिकारी नव्हते. नऊ ते बारा अशी परीक्षेची वेळ असताना देशभर ही परीक्षा अर्धा ते एक तास उशिरा सुरू झाली. त्यातही अनेक विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरवर अनेक व्यत्ययांचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा व संगणक उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. अशा अनेक विद्यार्थ्यांची परीक्षा 12 ते 3 या वेळेत घेतली गेली. सकाळच्या सत्रातील परीक्षा दुपारी झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना दुपारी पूर्वनियोजित असलेल्या सीमॅट परीक्षेस मुकावे लागले. परीक्षा पूर्ण करताना अनेकांचे पेपर ऑनलाईन जमा झाल्याचा संदेश न दिसल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीती पसरली. परीक्षा अधिकार्‍यांना कळविले असता त्यांनी लॅपटॉप व दुसर्‍या संगणकावर विद्यार्थ्यांचे लॉग इन करून पुन्हा पेपर सोडविण्यास सांगितले.याबाबत एनटीएला वेळोवेळी कळविले असता त्यास कोणतेही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकार्‍यांंमार्फत निवेदन देणे, लोकप्रतिनिधींना उच्च शिक्षण मंत्रालयाकडे निवेदन देण्यास सांगणे असे प्रयत्न सुरू केले आहेत.

सकाळपासून केंद्रावर गेलो होतो.केंद्रावर स्वच्छतागृहे किंवा इतर कोणतीही सुविधा देण्यात आलेली नव्हती.कंम्पुटर लवकर सुरू झाले नाहीत.पेपर सबमिट करतांना अडचणी आल्या.पुरेसे कंम्पुटर उपलब्ध करण्यात आले नाही.परीक्षा केंद्राचे पत्ते अर्धवट दिलेले होते.त्यामुळे मानसिक आणि शारिरिक त्रासाला सामोरे जावे लागले.
– शादाब खान, सपकाळ महाविद्यालय

 

 

जीपॅट ही परीक्षाही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा असून अशा तांत्रिक ढिसाळ नियोजन,आणि असुरक्षित वातावरणात घेण्यात आल्याने विदयार्थी आणि पालकांच्या चिंता वाढल्या आहेत. विद्यार्थ्याच्या भवितव्याचा प्रश्‍न आहे. राज्य आणि राज्याबाहेरील विद्यार्थ्यांच्या तक्रारी आमच्याकडे येत आहे. जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदन दिले आहे.याचीका दाखल करण्यात येणार आहे.
– मिलिंद वाघ, शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच

 

मुलांना न्याय देण्यासाठी परीक्षा रद्द होणे गरजेचे आहे. त्यासाठी न्यायालयीन मार्गाने जावे लागणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक मुलाच्या पालकांचे फोन आले.परीक्षेतील प्रश्‍न वेळोवेळी बदलून दिले जातात.यावेळी त्यांचा सिक्वेस सारखा होता.
– डॉ.मच्छिंद्र बोचरे
,शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच

हे ही वाचा :

Devyani Sonar

Recent Posts

डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…

20 hours ago

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…

20 hours ago

छगन भुजबळ मंत्रिमंडळात,उद्या मुंबईत शपथविधी

छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…

1 day ago

राशीभविष्य

12 राशींचे राशीभविष्य मेष रास  मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…

2 days ago

झाडे उठली जीवावर!

रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…

2 days ago

अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…

2 days ago