180 श्र्वानांचा सहभाग
नाशिक – पाळीव प्राणी हे अनेकांच्या घरातील महत्वाचे अंग आहे . पाळीव प्राण्यांमुळे घरात एक सकारात्मक वातावरण निर्माण होते .त्यातच रविवारची संध्याकाळ नाशिक मधील विविध प्रजातीच्या श्र्वानासाठी एक वेगळी पर्वणी होती . निमित्त होते ते ग्रेप काउंटी इको रिसॉर्ट आणि पेट परफेक्ट क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने. या प्रसंगी असंख्य श्वानप्रेमी आणि नाशिककरांना एकाच ठिकाणी विविध जातीच्या सुमारे 180 हून श्र्वानाना पाहण्याची संधी उपलब्ध झाली.
या डॉग शो आणि या पेट टूगेदर बाबत सांगताना नाशिक मधील पाळीव प्राण्यांचे नामवंत तज्ञ डॉ. दिग्विजय पाटील म्हणाले की या निमित्ताने कुत्र्यांना समाजात वावरण्याची सवय होते तसेच त्यांची निगा, त्यांचे अन्न , त्यांचे प्रशिक्षण याबाबत येथे मार्गदर्शन करण्यात आले. याच सोबत ज्यांना कुत्रे पाळायची इच्छा आहे त्यांना देखील ब्रीड कशी निवडावी , याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या डॉग शो मध्ये कुत्रे आणि त्यांच्या पालकांसाठी मजा आणि खेळ देखील आयोजित करण्यात आले . या शो चे औचित्य साधून नाशिककरांच्या रक्षणात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या पोलीस कुत्र्यांचा आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला . या प्रसंगी पोलीस उपायुक्त माधुरी कांगणे,तसेच असंख्य श्र्वानप्रेमी उपस्थित होते .