किम्स हॉस्पिटलचा मानवता एचसीजीबरोबर सामंजस्य करार

नाशिक ः प्रतिनिधी
कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एनएसइ किम्स)ने मानवता हेल्थकेअरचे संचालक डॉ. राज नगरकर यांच्यासोबत 325  खाटांची क्षमता असलेले किम्स-मानवता मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्स स्थापन करण्यासाठी नुकताच  सामंजस्य करार करण्यात आला.
डॉ. राज नगरकर यांच्या एच.सी.जी. मानवता क्युरी हॉस्पिटलच्या पंधराव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून डॉ.राज नगरकर यांचे वडील वसंतराव नगरकर यांच्या जन्मदिनानिमित्त नवीन हॉस्पिटलची घोषणा करण्यात आली. परवडणार्‍या दरात मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल नाशिकमध्ये साकारत असल्याने रुग्णांची होणारी धावपळ, विविध योजनेअंतर्गत मिळणार्‍या सवलती आदींचा अंतर्भाव या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये घेता येणार असल्याचे किम हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. भास्कर राव यांनी सांगितले.
कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (किम्स) हा आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील सर्वांत मोठा कॉर्पोरेट आरोग्य सेवा समूह आहे. नवीन रुग्णालय मार्च 24 पर्यंत रुग्णांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे, असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *