लाडक्या बहिणींसाठी पालकमंत्री भुसे यांनी मध्यरात्री गाठले वॉररूम

नाशिक:  प्रतिनिधी

लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये मिळावेत म्हणून यंत्रणा कामाला लागली आहे. रात्रीचा दिवस करत शासकीय यंत्रणा राबत आहे. मालेगाव येथे या योजनेसाठी चार शिफ्टमध्ये आता काम सुरू आहे. हे काम व्यवस्थित सुरू आहे की नाही याचीखात्री करण्यासाठी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी मध्यरात्री दीड वाजता भेट देऊन आढावा घेतला. आपल्या धडक कामकाज पद्धतीने दादा भुसे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मागच्याच आठवड्यात त्यांनी धान्य वितरण विभागालाहीअचानक भेट दिली होती.

महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री  ना.  एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सर्वत्र ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यात महिला भगिनींच्या उत्तुंग प्रतिसादाने मोठ्या संख्येने राबविली जात आहे. याच योजनेच्या पार्श्वभूमीवर मालेगाव येथे महापालिका, महसूल, महिला व बालविकास, पंचायत समिती येथे वॉर रूम तयार केलेले असून रोज चारही कक्ष ३ शिफ्टमध्ये काम करत होते. परंतु, काल . ना. दादाजी भुसे यांनी चारही कक्षांचा आढावा घेतला व ३ शिफ्ट ऐवजी ४ शिफ्ट मध्ये काम करावे असे आदेश दिले. त्याप्रमाणे सर्व कक्षांनी काल पासून ४ शिफ्ट चालू केल्या असून अचानक रात्री ०१:३० वाजता वरील सर्व चारही कक्षांच्या वॉर रूमला भेट देऊन तेथील कामाची भुसे यांनी पाहणी केली. यावेळी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शनपर सूचना देऊन त्यांची विचारपूस केली व सर्व कर्मचाऱ्यांना चहा, बिस्कीटचा अल्पोपहार व ड्रायफूटचे वाटप केले.

यावेळी, जिल्हाप्रमुख  संजय दुसाने, उपजिल्हाप्रमुख  सुनिल देवरे, उपजिल्हाप्रमुख तथा अध्यक्ष मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना . प्रमोद पाटील,  सुनिल चांगरे आदी उपस्थित होते.

#Dadajibhuse #Shivsena #Nashikmalegoan #Eknathshinde #Womensscheme

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *