कुख्यात गॅंगस्टर अबू सालेमला मनमाड येथून नाशिकला हलवले

कुख्यात गॅंगस्टर अबु सालेमला मनमाड येथून नाशिकला हलवले

मनमाड रेल्वे स्थानकाला आले छावणीचे स्वरुप..
मनमाड : आमिन शेख

कुख्यात गँगस्टर अबु सालेमला दिल्ली येथून मनमाडमार्गे नाशिक येथील सेंट्रल जेलमध्ये नेण्यात आले कर्नाटक एक्सप्रेसने मनमाड रेल्वे स्थानकावर आणुन त्याला रस्तामार्गे नाशिकच्या सेंट्रल जेल मध्ये नेण्यात आले 2002 साली अदानीला खंडणी मागितली याप्रकरणी दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल असुन याप्रकरणी सुनावणीसाठी त्याला दिल्लीला नेण्यात आले होते मात्र दिल्ली कोर्ट सुट्टीवर असल्याने त्याला 10 सप्टेंबर तारीख देण्यात आली यामुळे त्याला नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये रवाना करण्यात आले.मनमाड रेल्वे स्थानकावर तसेच शहरातील प्रत्येक चौकात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
2002 साली अदानीला खंडणी मागितल्या प्रकरणी दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी सुनावणी साठी अबु सालेम याला दिल्ली कोर्टात नेण्यात आले होते मात्र दिल्ली कोर्टाला सुट्टी असल्याने त्याला पुन्हा नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये नेण्यात आले यासाठी त्याला कर्नाटक एक्सप्रेसने विशेष डब्यात ब्लॅक कमांडो व विशेष पोलिसांच्या बंदोबस्त मध्ये मनमाड येथे आणण्यात आले येथून पोलिस बंदोबस्तात त्याला नाशिकच्या सेंट्रल जेलमधे रवाना करण्यात आले यावेळी शेकडो पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

पोलिसांची सर्वसामान्य नागरिक व पत्रकारावर दादागिरी..?
अबू सालेम हा कुख्यात गँगस्टर आहे तो अनेक गंभीर गुन्ह्यात जेलमध्ये शिक्षा भोगत आहे त्याच्या सुरक्षेसाठी करोडो रुपये खर्च होतात आजही त्याला एकदम कडक बंदोबस्त मध्ये दिल्ली वरून मनमाड स्थानक व त्यांनतर नाशिकच्या सेंट्रल जेल मध्ये नेण्यासाठी आनण्यात आले होते यावेळी दिल्ली पोलीस व महाराष्ट्र पोलिस यांचा कडक बंदोबस्त होता मात्र पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांना व काही पत्रकार यांच्यावरच दादागिरी केली कोणी शूटिंग काढू नये असे ओरडत सांगत असताना रस्त्यावर येणाऱ्या अनेक प्रवाशांना त्यांनी अक्षरशः अर्वाच्य भाषेत बोलून हाकलले एकप्रकारे पोलिसांनी सर्वसामान्य नागरिक व पत्रकार यांच्यावर दादागिरी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *