नाशिक

इगतपुरीजवळ 61 लाखांचा गुटखा जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, आयशरसह चालक ताब्यात

इगतपुरी : प्रतिनिधी
नाशिक-मुंबई महामार्गावरील इगतपुरी येथील अपना हॉटेलजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून मुंबईला जाणार्‍या आयशर गाडीवर कारवाई करीत 61 लाख 38 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त करून 12 लाख रुपये किमतीचा आयशर ताब्यात घेतला.
आयशर गाडीतून रविवारी (दि. 1) मुंबईकडे प्रतिबंधित असलेला गुटखा जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्याआधारे नाशिक- मुंबई महामार्गावरील तळेगाव शिवारात हॉटेल अपनाजवळ आयशर गाडीची (एमएच 46 6979) झडती घेतली. त्यात प्रतिबंधित बाजीराव मस्तानी नावाचा गुटखा आढळून आला. यात 73 गोण्यांतील 61 लाख 38 हजार रुपये किमतीचा बाजीराव मस्तानी गुटख्यासह 12 लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक असा 73 लाख 38 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार शरद धात्रक यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
या गुन्ह्यात वाहनचालक सय्यद गफूर सय्यद गुरसाब मुल्ला (वय 37, रा. ग्राम नरोना, ता. आळण, जि. गुलबर्गा, कर्नाटक) याला ताब्यात घेऊन इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक कांचन भोजने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तपास करीत आहेत.

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

15 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

15 hours ago