37 लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
दिंडोरी ः प्रतिनिधी
नाशिक-पेठ महामार्गावरील उमराळे बु. चौफुलीवर अवैधपणे सुगंधी गुटखा विक्रीसाठी पहाटेच्या सुमारास घेऊन जात असतांना दिंडोरी पोलिसांनी सापळा रचत गुटखा व वाहतूक करणारे वाहन असा एकूण 37 लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
उमराळे बु. चौफुलीवर अवैध सुगंधी गुटखा विक्रीसाठी जात होता. त्याचवेळी पहाटे पोलीस गस्त घालत असतांना सफेद रंगाची अशोक लेलॅन्ड कंपनीच्या (एमएच 04 एलवाय 8030) वाहनामध्ये अवैध गुटखा आढळून आला. 2 लाख 17 हजार 800 रुपयांचे 1.100 विमल पान मसाल्याचे पिवळ्या रंगाचे पॅकेट प्रत्येकी किंमत 198 रुपये प्रमाणे आहे. 24 हजार 200 रुपये किमतीचे सुगंधीत तंबाखूचे पिवळ्या रंगाचे पॅकेट प्रत्येकी किंमत 22 रुपये प्रमाणे, 5 लाख 17 हजार रुपयांचे विमल पान मसाल्याचे हिरव्या रंगाचे पॅकेट प्रत्येकी किंमत 470 रुपये आहे. 33 हजार किंमतीचे सुगंधीत तंबाखू पॅकेट प्रत्येकी किंमत 30 रुपये प्रमाणे, 3 लाख रुपये किंमतीची सफेद रंगाची अशोका लेलॅन्ड कंपनीची गाडी असा एकूण 37 लाख 92 हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलिस शिपाई मधुकर बेंडकोळी यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे,आरोपी योगेश देवगीर गोसावी (वय 38) रा. अवनखेड याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे, अधिक तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलीस करीत आहे,
मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचारवर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि निर्घृण खूनप्रकरणी येथील…
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…