नाशिकरोड गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
शहरात वाढत्या वाहन चोर्यांना आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी नाशिकरोड पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. सिन्नर फाटा परिसरात अत्यंत चाणाक्षपणे सापळा रचून गुन्हे शोध पथकाने एका अट्टल दुचाकी चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईमुळे नाशिकरोड आणि अहिल्यानगर (संगमनेर) परिसरातील दुचाकी चोरीचे तब्बल 5 गुन्हे उघडकीस आले असून, आरोपीकडून 1 लाख 83 हजार रुपये किमतीच्या 5 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांनी शहरात रात्रंदिवस गस्त वाढवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अतुल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि गुन्हे शोध पथकातील पोहवा विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश रानडे, अर्जुन गिते हे दि. 15 जून रोजी दुपारी सिन्नर फाटा परिसरात गस्त घालत होते. पथकातील अंमलदार सिन्नर फाट्यावरील महाराष्ट्र रसवंतिगृहाजवळ थांबलेले असताना, तिथे रस पिणार्या एका व्यक्तीने पोलिसांचे वाहन आणि साध्या वेशातील पोलिसांना पाहिले. पोलिसांची चाहूल लागताच त्याने हातातील रसाचा ग्लास तसाच ठेवून आपल्या ताब्यातील स्प्लेंडर गाडीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. व्यक्तीची ही संशयास्पद हालचाल पाहून पथकातील कर्मचार्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याचा पाठलाग करून त्याला जागीच पकडले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताची चौकशी केली असता, त्याने आपले नाव ललित सागर देवरे (वय 33, रा. उद्योग भवन, सिप्रा बिल्डिंगसमोर, सिन्नर) असे सांगितले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातील गाडीच्या कागदपत्रांची विचारपूस केली, मात्र तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही.
गुन्हे शोध पथकाने विविध पोलीस ठाण्यांचे रेकॉर्ड तपासले असता, या आरोपीवर कल्याण पोलीस ठाण्यात यापूर्वीच चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. तो एक सराईत दुचाकीचोर असल्याचे निष्पन्न झाले. संशयित ललित देवरे याला नाशिकरोड पोलीस ठाण्यात आणून त्याची सखोल चौकशी करण्यात आली. त्याच्या ताब्यातील गाडीच्या चेसी आणि इंजिन नंबरची पडताळणी केली असता, ती गाडी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील चोरीची असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याला अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने इतरही चोर्यांची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण पाच मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.
त्यामुळे नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतील चार गुन्हे तर अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील एक गुन्हा उघड झाला आहे. एकूण जप्त मुद्देमालात 1,83,000 किमतीच्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात
आल्या आहेत.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे तपास अंमलदार पोलीस हवालदार विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, पोलीस अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश रानडे आणि अर्जुन गिते यांनी केली आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास
करीत आहेत.
Habitual two-wheeler thief falls into police net during patrol.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…