नाशिक

नाशकात आता दर शनिवारचा पाणीपुरवठा राहणार बंद!

मनपाचा निर्णय; ऑगस्टमध्ये दोन दिवसांआड पाणी

नाशिक : प्रतिनिधी
अल निनो परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी नाशिक महापालिकेने दर शनिवारी पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे प्रशासनाने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. जूनचा दुसरा आठवडा उलटूनही शहराकडे पावसाने पाठ फिरवल्याने भविष्यातील पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान महापालिका प्रशासनाने म्हटले की, भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यावर्षी अल निनो परीस्थितीचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यातील विविध धरणेस जलाशय व इतर जलस्रोेतांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करता पिण्याच्या पाण्याचा गरजांना
सर्वोच्य प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत. भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे आवश्यक असल्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहे.
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सर्वसाधारणपणे सरासरी दररोज 600 द.ल.लि. प्रतिदिन इतके कच्चे पाणी गंगापूर धरण समूह व मुकणे धरण येथून उचलले जाते. सात ठिकाणी असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रांत शुद्धीकरण करून 134 जलकुंभांद्वारे व सुमारे 2502 किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांमधून शहरात पाणी वितरित केले जाते. सध्या एकूण आरक्षण 6400 पैकी आतापर्यंत 5133.99 पाणीवापर झाला आहे. शिल्लक पाणीसाठा 1266.01 आहे. शिल्लक पाणीसाठा 60 दिवस पुरेल इतका शिल्लक आहे. त्यात 18 दिवसांची तूट येत आहे. त्यानुसार जूनमधील दोन शनिवार, जुलैतील चार शनिवार व ऑगस्ट महिन्यात दोन दिवसांआड पाणीकपात करणे अनिवार्य असल्याने त्याचे नियोजन केले आहे.

यानुसार असेल नियोजन
जुन व जुलै महिन्यातील प्रत्येक शनिवारी पाणीपुरवठा होणार नाही. ऑगस्ट महिन्यात दोन दिवसांआड म्हणजेच 1, 4, 7, 10, 13, 16, 19, 22, 25, 28 व 31 ऑगस्ट या दिवशी पाणीपुरवठा होणार नाही. ही माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांनी दिली.

 

Water supply in Nashik to remain shut every Saturday from now on!

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

14 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

14 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

14 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

14 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

14 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

15 hours ago