मंगल देशा, पवित्र देशा,
पावन देशा, प्रणाम घ्यावा माझा
हा महाराष्ट्र देशा.
कष्टकरी वर्ग मिळेल ते काम करून आपले आणि कुटुंबाचे पोट भरण्यासाठी आपले गाव सोडून शहरी भागात येतो. घाम गाळून प्रसंगी उपाशी पोटी राहून रक्ताचे पाणी करून कष्ट करत असतो.त्यांना कृतज्ञता म्हणून 1 मे रोजी कामगार दिवस म्हणून आपण साजरा करतो. 1 मे या दिवसाला महाराष्ट्रात खूप महत्त्व आहे. कारण या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. मात्र, एवढंच नाही 1 मे रोजी आंतरराष्ट्रीय महत्त्वदेखील आहे. कारण जगभरात हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. अठराव्या शतकात झालेल्या एका कामगार चळवळीच्या गौरवासाठी आजही जगभरात साजरा करण्यात येणारा हा एक खास दिवस म्हणून ओळखला जातो. भारतात कामगार दिनानिमित्त सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात येते. विशेष म्हणजे जगभरात अनेक देशांमध्ये हा दिवस निरनिराळ्या पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यासाठीच 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन हा सर्व कामगार बंधूंचा हक्काचा आणि आनंदाचा दिवस असतो.
अलका सानप