न्यायडोंगरी येथे जंगली प्राण्याचा बालकांवर हल्ला

.न्यायडोंगरी,

न्यायडोंगरी येथे जंगली तरसाच्या हल्ल्यात २ मुले जखमी झाल्याची घटना घडली. परिसरात प्रथमच घडलेल्या तरसाच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, इंदिरानगर (गवळीवाडा ) न्यायडोंगरी येथील धना नाना दळवी यांचा वनविभाग क्षेत्रात असलेल्या मन्याड नदी पात्रालगत  कार्यक्रम होता. सदर कार्यक्रमास उशिर असल्याने थोड्या दूर अंतरावर नदीपात्रालगत मुले खेळण्यासाठी गेली व त्या ठिकाणी असलेल्या कपारीत दबा धरून बसलेल्या तरसाने कार्यक्रमास आलेले महेश ठाकरे (११) व कृष्णा ठाकरे (१३) या २ मुलांवर कपारीतून बाहेर पळून जात असताना मुलांच्या डोक्याला पायाच्या पंजाने जखमी करीत पळ काढला.अचानक झालेल्या हल्ल्याने मुलांनी आरडाओरडा केला व त्याचक्षणी तरसाने जंगलाकडे धूम ठोकली. जखमी झालेल्या मुलांना तातडीने डॉ.राठोड त्यांच्या खाजगी दवाखान्यात दाखल करून उपचार करून घेतले.
तरसाने केलेल्या हल्ल्यामुळे परिसरातील वाडीवस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे. वन विभागाने या परिसरातील तरसाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *